पाच पिस्तुले;२२ जिवंत काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:35 AM2018-04-25T00:35:09+5:302018-04-25T00:35:09+5:30

काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.

 Five pistols; 22 live cartridges | पाच पिस्तुले;२२ जिवंत काडतुसे

पाच पिस्तुले;२२ जिवंत काडतुसे

Next

सिडको / नाशिकरोड : काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.  शहरातील अंबड व नाशिकरोड परिसरात दोघा संशयितांकडून प्रत्येकी तीन व दोन असे एकूण पाच पिस्तुलांसह २२ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पिस्तूल विक्री करणाऱ्या एका इसमास अटक केली. त्याच्याकडून एक लाख नऊ हजार २५० रुपये किमतीचे तीन गावठी पिस्तुलांसह ११ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे शोध पथकाला संबंधित चुंचाळे शिवारास सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एका एक्सयूव्ही मोटार संशयास्पदरीत्या पथकाला आढळली. पोलिसांनी मोटारीला घेरले. पोलिसांनी मोटारीमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलेला मनोज मच्छिंद्र शार्दुल (२५,रा.चुंचाळे) याची कसून चौकशी करत अंगझडती घेतली.
सत्कारपॉइंट येते आवळल्या मुसक्या
दुसºया घटनेत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक संजय गामणे यांनी सत्कारपॉइंट नाशिकरोड येथे सापळा रचला. एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना माहिती दिली. उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी सापळा रचला. संशयित इसम संग्राम बिंदुमाधव फडके (३९, रा.गंधर्वनगरी) हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. फडके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्तूल पोलिसांना आढळले. तसेच त्याच्याकडून ११ जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

Web Title:  Five pistols; 22 live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.