‘विसर्जन’, ‘रिले’ नाटकांना प्रथम पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:23 AM2019-06-11T01:23:38+5:302019-06-11T01:24:00+5:30

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५८व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या विसर्जन नाटकाला प्रथम क्रमांक ाचे पारितोषिक मिळाले, तर १६व्या बालनाट्य स्पर्धेतील विजेत्या नाशिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रिलेच्या कलावंतांसह विविध गटांतून ५८ कलावंतांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

 First Prize for 'Visarjan' and 'Relay' plays | ‘विसर्जन’, ‘रिले’ नाटकांना प्रथम पारितोषिक

‘विसर्जन’, ‘रिले’ नाटकांना प्रथम पारितोषिक

Next

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५८व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या विसर्जन नाटकाला प्रथम क्रमांक ाचे पारितोषिक मिळाले, तर १६व्या बालनाट्य स्पर्धेतील विजेत्या नाशिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रिलेच्या कलावंतांसह विविध गटांतून ५८ कलावंतांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
प. सा. नाट्यगृहात रंगलेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांच्या उपस्थितीत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, नगरसेवक शाहू खैरे, सुनील ढगे, विवेक गरुड, रवींद्र ढवळे, सुरेश गायधनी आदींच्या उपस्थित विजेत्या कलावंतांचा गौरव करण्यात आला. यात नगर अर्बन स्टाफ कला क्रीडा मंडळाच्या ‘द एक्स्चेंज’ नाटकाला द्वितीय, जळगावच्या समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या ‘मुक्ती’ला तृतीय, क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ‘तुझ्या जागी मी असते तर’ बालनाट्याला द्वितीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ‘विसर्जन’च्या दिग्दर्शनासाठी सचिन शिंदे यांना प्रथम, रोहित पगारे यांना ‘नागमंडल’ द्वितीय, तर धनंजय वाबळे यांना रिले बालनाट्याच्या दिग्दर्शनासाठी गौरविण्यात आले. धनंजय गोसावी, दीप्ती चंद्रात्रे, सृष्टी पंडित यांना अभिनयाची रौप्य पदके बहाल करण्यात आली. नाशिक केंद्रातून संस्कृती नाशिकने सादर केलेल्या ‘तिरथ में तो सब पानी हैं या नाटकाला द्वितीय, एस. एम. रिसर्च फाउंडेशनच्या नागमंडल नाटकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. मराठी नाटकवेडा नाटकासाठी काय करतो या आशयाच्या ‘ज्याचा शेवट गोड’ या नाटकाने मनोरंजन केले.
इतर पारितोषिके अशी
रंगभूषा : माणिक कानडे, अनिल कडवे
प्रकाशयोजना : राहुल गायकवाड, रवि रहाणे, चैतन्य गायधनी
नेपथ्य : लक्ष्मण कोकणे, गणेश सोनवणे, कार्तिकेय पाटील
अभिनय : बालनाट्य : खुशी पाटील, श्रद्धा पाटील, युगा कुलकर्णी, इशान कुलकर्णी, ऋषीकेश मांडे. राज्य नाट्य : प्रशांत हिरे, राहुल बर्वे, स्नेहा ओक, पूनम देशमुख, गायत्री पवार, गीतांजली घोरपडे, प्राज्ञी मोराणकर, कुंतक गायधनी, राजेंद्र जव्हेरी, अजय तारगे.

Web Title:  First Prize for 'Visarjan' and 'Relay' plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.