...अखेर प्रबुद्धनगरातील शाळेचे कुलूप उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:57 AM2019-06-20T00:57:03+5:302019-06-20T00:57:25+5:30

नाशिक : प्रबुद्धनगरातील नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालयाला लावलेले कुलूप अखेर संस्थेच्या सचिवांनी उघडल्याने बुधवारपासून शाळा ...

 ... finally the school of the illuminated school opened | ...अखेर प्रबुद्धनगरातील शाळेचे कुलूप उघडले

...अखेर प्रबुद्धनगरातील शाळेचे कुलूप उघडले

Next

नाशिक : प्रबुद्धनगरातील नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालयाला लावलेले कुलूप अखेर संस्थेच्या सचिवांनी उघडल्याने बुधवारपासून शाळा नियमित सुरू झाली आहे.
सातपूर प्रबुद्धनगरात १९९५ पासून नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालय सुरू आहे. या विद्यालयात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा भरते. मात्र संस्थाचालक आणि शिक्षकांमधील अंतर्गत वादामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच शाळा भरते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शाळा उघडल्याने तुर्तात तरी वाद बाजूला पडला आहे.
या शाळेत प्रबुद्धनगरातील हातमजूर कामगार, कष्टकऱ्यांचीच मुले शिक्षण घेत आहेत. अनुदानित असलेल्या या शाळेत मागील काही दिवसांपासून शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने संस्थाचालकाने शालेय सुटीत शाळा इमारतीला टाळे ठोकले होते. त्यामुळे दोन दिवस विद्यार्थ्यांना बाहेरच रस्त्यावर थांबावे लागले होते. याबाबत शाळेतील शिक्षकांनी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी महाजन यांची भेट घेऊन संस्था सचिव सखाराम सरकटे यांच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन दिले. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने बुधवारी सकाळीच संस्थेचे सचिव सखाराम सरकटे यांनी शाळेत येऊन शिक्षकांच्या हवाली कुलपाची चावी सोपविली. त्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान संस्थाचालकांनी शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नेमणूक केली नसल्याने शालेय दाखले, पोषण आहार, वेतनबिले, शासकीय पत्रव्यवहार करण्यास स्वाक्षरीचे अधिकार नसल्याने नियमित कामकाजात अडचणी येत असल्याची माहिती शिक्षकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पटसंख्या २०० पर्यंत
येथे २००च्या आसपास पटसंख्या आहे. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद शाळेला मिळतो. परिसरातील गोरगरीब, मोलमजुरी करणारे, कामगार, रोजंदारीवरील कामगारांची मुले या शाळेत शिकतात. शाळा नियमित सुरू झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
संस्थाचालक आणि शिक्षकांमधील वादामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली प्रबुद्धनगरातील शारदा विद्यामंदिर शाळा बुधवारपासून नियमित सुरू झाली आहे. शाळा उघडण्याबाबती स्पष्ट शाश्वती नसल्याने विद्यार्थी संख्येवर याचा परिणाम जाणवला. गुरूवारपासून विद्यार्थी संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  ... finally the school of the illuminated school opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.