इंधनचोरी प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:34 AM2019-03-02T02:34:07+5:302019-03-02T02:34:59+5:30

मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे, ता. नांदगाव येथे टँकरमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी इंधन काढत असताना सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या पथकाने छापा मारला असता टँकरचालक, मालक व त्याच्या साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.

Filed a case in the case of fuel fraud | इंधनचोरी प्रकरणी गुन्हा दाखल

इंधनचोरी प्रकरणी गुन्हा दाखल

Next

नाशिक : मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे, ता. नांदगाव येथे टँकरमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी इंधन काढत असताना सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या पथकाने छापा मारला असता टँकरचालक, मालक व त्याच्या साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. सदरचा भरलेला टँकर व त्यामधील काढलेले ३० लिटर इंधन, दोन प्लॅस्टिक कॅन असा एकूण २४ लाख १ हजार ९२० रु पयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filed a case in the case of fuel fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.