नाशिक तहसील कार्यालयातून फाईल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 04:06 PM2018-04-18T16:06:31+5:302018-04-18T16:06:31+5:30

पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे पूर्वगामी कुळ दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहिती कायद्याच्या अधिकारात जनमाहिती

File missing from Nashik Tahsil office | नाशिक तहसील कार्यालयातून फाईल गहाळ

नाशिक तहसील कार्यालयातून फाईल गहाळ

googlenewsNext
ठळक मुद्देशोधूनही सापडेना : माहिती आयोगाच्या आदेशाला हरताळसर्टिफाईड नक्कल कोर्ट कामासाठी मिळावी यासाठी माहिती मागविली होती.

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्टÑ पोलीस अकादमीसमोरील सुमारे ६० एकर जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे नाशिक तहसीलदार कार्यालयातून गहाळ झाल्याची बाब उघडकीस आली असून, यासंदर्भात जागा मालकाने राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले असता, तत्काळ कागदपत्रे देण्याचे आदेश देऊनही तहसील कार्यालयाने त्याची अंमलबजावणी न केल्याने याबाबत आता थेट राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्टÑ पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे पूर्वगामी कुळ दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहिती कायद्याच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा कूळ कायदा अव्वल कारकून, तहसील कार्यालय यांच्याकडे सदर केसच्या निर्णयाच्या, जाबजबाबाच्या व कब्जे पावतीच्या नकला मिळणेसाठी दोन अर्ज केले होते. तथापि, सदर केसची फाईल रेकॉर्ड रूममध्ये आढळून येत नाही, असे तहसील कार्यालयातून दिगंबर अहिरवार यांना कळविण्यात आले होते. त्या विरुद्ध अहिरवार यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे अपील करूनही सदर कागदपत्रांचा शोध लागू शकला नाही म्हणून अहिरवार यांनी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे द्वितीय अपील दाखल करण्यात आले होते. पहिल्या अपिलात खंडपीठात विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी निर्णय मिळाल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी मागितलेल्या माहिती संदर्भात कार्यालयातील अभिलेखात कसून शोध घ्यावा व त्यानंतर कार्यालयातील उपलब्ध असलेली माहिती नोंदणीकृत पोच डाकने विनामूल्य पुरवावी, असा आदेश दिला होता. त्यावर अहिरवार यांनी दुसरे अपील दाखल केले होते. त्यात सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावती झालेली नसतानाही सातबारा उताऱ्यावर कब्जा दिल्याचे व कब्जा पावती झाल्याचा शेरा नाशिक तलाठ्याने मारल्याची नोंद असल्याने या कब्जा पावतीची सर्टिफाईड नक्कल कोर्ट कामासाठी मिळावी यासाठी माहिती मागविली होती. 

Web Title: File missing from Nashik Tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.