‘निपाह’ची भीती; जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:23 AM2018-05-24T00:23:45+5:302018-05-24T00:24:26+5:30

केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़

 Fear of 'Nipah'; District hospital system ready | ‘निपाह’ची भीती; जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज

‘निपाह’ची भीती; जिल्हा रुग्णालय यंत्रणा सज्ज

Next

नाशिक : केरळ येथे निपाह विषाणू आजाराचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत या आजाराचा महाराष्ट्राला धोका नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे असून, निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे़  आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या स्वाइन फ्लू कक्षात संशयित रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉग़जानन होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ त्यामुळे काळजीचे कारण नाही.
निपाह विषाणूचा प्रसार
या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्त्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या (फ्रूट बेट्स) मार्फत होतो़ वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो़ डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील याची बाधा होऊ शकते़ १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्त्वे बाधित झाले होते़ निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते़ रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते़ वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो़ याचा कालावधी हा ५ ते १४ दिवस इतका असतो़
संशयित  निपाह रुग्ण
ताप, डोके दुखी, झोपाळलेपण, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वराकरिता निगेटिव्ह असणे आणि मागील  तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागात
प्रवासाचा इतिहास आहे़  अशा वर्णनाचा कोणत्याही रुग्णास निपाह विषाणू रुग्ण म्हणून गृहीत धरून त्यास विलगीकरण कक्षात भरती करावे तसेच त्याचा  नमुना एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

Web Title:  Fear of 'Nipah'; District hospital system ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.