भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:04 AM2019-02-26T01:04:33+5:302019-02-26T01:04:51+5:30

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं.

Fear does not end here ... | भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

Next

नाशिक : दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. एका क्षणात घडलेली घटना आणि घटनेनंतर एकेक मृतदेह स्मशानभूमीत येतांनाचे दृश्यपाहून त्या भयावह अपघाताचे भय मानातून जात नाही. अशा भावनाविवश प्रतिक्रिया आजही अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उमटत होत्या.
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात आगरटाकळीतील राहुलनगरमधील एकाच घराण्यातील सात जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर कुटुंबीय अजूनही सावरले नाही. मयतांना अग्निडाग दिल्यानंतर जणू काही गंभीर घडलेच नाही अशा चेहऱ्याने जखमींसमोर जावे लागले. रात्री आणि दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जखमींच्या उपचारासाठी आणि पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयातून हलविण्याचे काम सुरू होते. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयातून काही जखमींना जिल्हा रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींना त्या भयावह घटनेतील वास्तव माहिती होऊ नये यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत.
कांडेकर, डांगे, गवळी आणि लोंढे कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरून रविवारचा घातवार अजूनही जात नाही. घटनेतील तो आक्राळ चेहरा त्यांना अजूनही भयग्रस्त करून टाकतो. घटनेनंतरच्या रात्रीनंतर कुणीही शांत झोपू शकलेले नाही.
रविवारचा काळा दिवस या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण टाकळीवासीयांना अस्वस्थ करणारा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून अपघाताची चर्चा थांबलेली नाही. अपघाताच्या घटनेनंतर सारेच दु:खात असले तरी एकमेकांना आधार देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागत आहे. डोळ्यातील आश्रू आटले आहेत, हुंदक्यांच्या आवाजातील गहिवर दु:खाची गहरी जाणीव निर्माण करणारा आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्यांच्या डोळ्यात या मृत्यू तांडवाचे भय अजूनही स्पष्टपणे जाणवते.

Web Title: Fear does not end here ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.