पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:10 AM2019-07-21T01:10:46+5:302019-07-21T01:11:39+5:30

शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

The father tried to kill the drunken children of alcohol | पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न

पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न

Next

नाशिकरोड : शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
शिंदे गाव येथील ऋषिकेश पंढरीनाथ बोराडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आई, बहीण घरी असतांना वडिल पंढरीनाथ बाबुराव बोराडे हे दारूच्या नशेत घरी आले. यावेळी बहीण निकिता हिने वडील पंढरीनाथ हिच्याकडे शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी हजार रुपये मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने पंढरीनाथ यांनी मुलगा ऋषिकेश व मुलगी निकिता यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. रागाच्या भरात घराशेजारील जनावराच्या गोठ्यात असलेले किटकनाशक रोगर हे विषारी औषध असलेली बाटली घेऊन येत मुलगी निकीता व मुलगा ऋषिकेश यांना बळजबरीने पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऋषिकेशची आई सीमा यांनी आरडाओरड करून मुलांची सोडवणूक करत आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
हिंगणवेढे येथे युवकावर हल्ला

नाशिकरोड : लग्नासाठी उचल म्हणून दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने युवकावर हल्ला करून त्याला जखमी केले.
हिंगणवेढे येथील ओढा वाट रस्ता येथे राहणाऱ्या प्रशांत भास्कर कराड याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, लग्नासाठी उचल म्हणून दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने साहेबराव पवार, भावड्या साहेबराव पवार, विधू साहेबराव पवार यांनी हाता बुक्क्यांनी मारहाण केली.

Web Title: The father tried to kill the drunken children of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.