पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्र मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:22 PM2018-10-21T17:22:14+5:302018-10-21T17:22:56+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर ...

 Farmers in Yeola, for the recurring arrival of Palkhed, | पालखेड च्या आवर्तनासाठी येवल्यातील शेतकरी आक्र मक

  येवला तालुक्यातील एरंडगाव येथे पालखेडच्या आवर्तनासाठी जमलेल्या शेतकº्यांसमोर बोलताना जलहक्क संघर्ष समतिीचे संयोजक भागवत सोनवणे 

Next
ठळक मुद्दे कृती समितीची स्थापना:जायकवाडी साठी थेंबभर ही पाणी न जाऊ देण्याचा निर्धार


जळगाव नेऊर :
येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरीता येथील हक्काच्या पाण्यावर डल्ला मारु न ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतुन वगळण्यात आले आहे. शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी केले.
येवल्यात पालखेड चे पाणी पेटले असून जायकवाडी ला पाणी सोडण्याचे संकट आपल्या मुळावर येऊन येवला तालुक्यातील शेती उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे.सरकारची यामागे सुडाची भावना असली जनता आता आपला लढा स्वत: च लढण्यास सज्ज झाली असून त्या साठी पालखेड डावा कालवा कृती समतिी स्थापन करण्यात आली आहे.
जलहक्क संघर्ष समतिीचे संयोजक भागवत राव सोनवणे हे पालखेड कालवा कृती समितीचे निमंत्रक असून पालखेड परिसरातीलसर्व शेतकरी बांधव या कृती समितीचे सदस्य राहणार आहेत.
एरंडगाव येथील पालखेड वसाहतीच्या आवारात कृती समितीचीपहिली बैठक संपन्न झाली .
पालखेड कालवा कृती समतिीच्या आजच्या स्थापनेच्या दिवशी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकर्यांनी एरंडगाव येथे जमून सरकारचा निषेध करून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
पालखेड चे रब्बी साठी चे पाणी सिंचन आवर्तन न्याय पद्धतीने मिळण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज रविवार दि. २१ रोजी सकाळीएरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी लढा उभारणे, पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे,आदींविषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, शेरु भाई मोमीन, आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी सोनवणे म्हणाले की, येवला तालुका दुष्काळाच्या यादीत न येण्याचे महत्वाचे कारण, शासन दरबारी असलेल्या पर्जन्य मापकाच्या नोंदीपासून शासनाकडे चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे. पर्जन्यमापक यंत्र येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारासह जिल्हा परिषदेच्या मुखेड, पाटोदा, अंदरसूल, नगरसून या चार गटात बसविण्यात आले आहे. मात्र, त्यावरील नोंदी न घेता येवले शहरातील तहसिल कार्यालय आवारातील पर्जन्यमापकावरील नोंदी घेतल्या गेल्याने ही चुकीची माहिती शासनाकडे पुरविण्यात आली आहे. या नोंदीवरु न तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची माहिती पुरविण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरु न घेतली आहे. त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरु न येवल्याला दुष्काळाच्या यादीतुन वगळले आहे. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून नदीपात्रही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस या परिसरात झालेला नाही. पर्जन्य मानाच्या निकषानुसार नगरसूल व अंदरसूल मंडळातील प्रत्येक गाव दुष्काळी आहे. या परिसरात भिषण पाणी टंचाई, चारा टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तने ही आपल्या हक्काची असून ती मिळालीच पाहिजे. या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर चक्काजाम करण्याबरोबरच आपण न्यायालयातही धाव घेणार असल्याचे भागवतराव सोनवणे यांनी सांगितले. यााप्रसंगी प्रभाकर रंधे, रतन मढवई, सुनील साताळकर, भगवान ठोंबरे, माजी सरपंच नवनाथ लभडे, विठ्ठलं वाळके, सीताराम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, वसंत झांबरे, महेबूब शेख, रावसाहेब आहेर, अनिल गायकवाड, प्रकाश साताळकर, बाळासाहेब साताळकर, रावसाहेब झांबरे, सुधाकर ठोंबरे, श्याम गुंड, शिवाजी खापरे, निवृत्ती मढवई आदींसह
 

Web Title:  Farmers in Yeola, for the recurring arrival of Palkhed,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.