फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:30 PM2019-03-14T22:30:41+5:302019-03-14T22:32:15+5:30

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.

Farmers' struggle to save orchards | फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Next
ठळक मुद्देपाटोदा : पाणी टँकरचे वाढले ; झाडाखाली पाचटाचे आच्छादन

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.
येवल्याच्या पश्चिम पट्यात पाटोदा,ठाणगाव,धुळगाव,पिंपरी,कानडी,विखरणी,कातरणी,आडगावरेपाळ,मुरमी ,निलखेडे,सोमठाणदेश, दहेगाव पाटोदा,शिरसगाव,वळदगाव, पिंपळगाव,व परिसरातील गावांमध्ये हजारो एकर द्राक्ष व डाळिंब बागा आहेत.आधुनिक शेतीची कास धरत येथील शेतकर्यांनी बागांचे मोठया प्रमाणात संगोपन करीत व निर्यातक्षम द्राक्ष व डाळिंब उत्पादन करून आपल्या मालाची परदेशात छाप पाडली आहे.असे असतांना दरवर्षी कमी कमी होत चाललेल्या पर्जन्यमानामुळे या बागांना पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.आशाही परिस्थितीत शेतकरी कमी पाण्यावर बागा जागवीत आहे.यावर्षी तर दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून पिण्याच्या पाण्याची इथे कमतरता असतांना बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागातील शेतकरी आजमतिीस उपलब्ध होईल तेथून टँकरने एका खेपेस पाच ते सहा हजार रु पये खर्च करून पाणी आणून ते ड्रीप द्वारे बागांना देत आहेत.तसेच उसाचे पाचट हे पाच रु पये किलो प्रमाणे विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन करीत आहे त्यामुळे झाड गारवा निर्माण होण्यास मदत होत आहे. सध्या या भागात उन्हाचे प्रमाण वाढले असून सूर्य मोठया प्रमाणात आग ओकू लागल्याने बागा अखेरच्या घटका मोजीत असून शेतकर्यांची मजुरांकरवी झाडे जगविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या पुढे पाणी उपलब्ध झाले नाही तर हा खर्च करूनही बागा वाचतील का या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे.
तीन एकर डाळिंब बाग असून या भागात उन्हाचे प्रमाण वाढले आहे.मुबलक पाणी नसल्याने बागा सुकून चालल्या आहेत .झाडांच्या बुडांना गारवा राहावा म्हणून उसाचे पाचट विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन केले आहे त्यामुळे गारवा टिकून राहात आहे.रामदास दौंडे,संतोष दौंडे डाळिंब उत्पादक शेतकरी दहेगाव पाटोदा
(फोटो १४ पाटोदा फोटो,१४ पाटोदा फोटो १)

Web Title: Farmers' struggle to save orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी