शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:57 AM2018-01-20T00:57:20+5:302018-01-20T00:57:59+5:30

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे.

Farmers resentful: deal of billions of rupees in dealings: Vinchchor onion subdivision 'eclipse' | शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

Next
ठळक मुद्देजुना नवीन व्यापारी असा वाद अतिरिक्त जागेचा शोध

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे. जुना नवीन व्यापारी असा वाद उफाळून आल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील व्यवहार थंड झाले आहेत. व्यापारी धोरणाचा फटका शेतकºयांसह इतर घटकांना बसत असून, तीन दिवसांपासून लिलाव बंद असल्याने सुमारे पाच ते सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीने दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवासुविधांमुळे अल्पावधीतच भरारी घेतल्याने शेतकºयांसह विंचूर गावासाठी मार्केट वरदान ठरले. आठवड्यातील फक्त एक दिवस मार्केट बंद ठेवून अमावास्या असो की सण त्या दिवशी मार्केट सुरूच राहत असल्याने शेतकºयांनी आपला शेतमाल सकाळी विंचूर उपबाजारात आणायचा आणि दुपारपर्यंत आॅनलाइन व्यवहार करून मोकळे व्हायचे, असा सुरळीत क्रम चालू होता. शेतक-यांच्या भरघोस प्रतिसादामुळे जागा कमी पडत असल्याने बाजार समतिी अतिरिक्त जागेचा शोधात आहे. मात्र गेल्या चार मिहन्यांपासून व्यविस्थत सुरु असलेल्या व प्रगतीपथावर असलेली उपबाजार समतिी अखेर व्यापा-यांच्या भांडणामुळे बंदच्या ग्रहणात अडकली आहे. स्थानिक व्यापा-यांसह कोपरगाव, मुंबई, दिल्ली, केरळ यासह अन्य परराज्यातील असे एकुण ५० च्या आसपास व्यापारी असले तरी प्रत्यक्षात १२ ते १५ खरेदीदार प्रत्यक्ष लिलावात सहभागी होत आहेत. बाजार समतिीच्यावतीने व्यापा-यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करु न देण्यात आल्या आहेत.

Web Title: Farmers resentful: deal of billions of rupees in dealings: Vinchchor onion subdivision 'eclipse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार