दोडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:33 PM2019-06-16T18:33:07+5:302019-06-16T18:33:25+5:30

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Farmer's death by lying in a tractor well in Dodi | दोडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दोडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Next

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
निवृत्ती सखाराम आव्हाड (५८) रा. दोडी ता. सिन्नर असे मृत शेतकºयाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवृत्ती आव्हाड हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरीपपूर्व मशागतीचे काम आटोपून घराकडे जात होते. याचदरम्यान एक ओहोळ चढून जात असताना अचानक विद्युततारा समोर दिसल्याने ट्रॅक्टर वळविण्याच्या प्रयत्नात त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टरसह आव्हाड पन्नास फूट खोल विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी निवृत्ती आव्हाड यांना विहिरीबाहेर काढून दोडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. मुंढे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना आव्हाड यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. आव्हाड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीने नादुरूस्त पोल व वीजवाहक तारा वेळेत दुरूस्त केल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ग्रामस्थांनी कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Farmer's death by lying in a tractor well in Dodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी