गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:21 AM2019-07-22T01:21:11+5:302019-07-22T01:22:35+5:30

: भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार बुºहान शेख याने स्वत:च्या वडिलांसह दाजीच्या मदतीने वडाळागाव चौफुली परिसरात विहितगाव येथील शेतकऱ्यांना शनिवारी (दि.२०) रात्री बारा वाजेच्या सुमारास मारहाण क रत त्यांच्याजवळील ३ हजार रुपये काढून घेत रिक्षातून पोबारा केला होता.

 The farmers beat the punda | गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहाण

गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहाण

Next


इंदिरानगर : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार बुºहान शेख याने स्वत:च्या वडिलांसह दाजीच्या मदतीने वडाळागाव चौफुली परिसरात विहितगाव येथील शेतकऱ्यांना शनिवारी (दि.२०) रात्री बारा वाजेच्या सुमारास मारहाण क रत त्यांच्याजवळील ३ हजार रुपये काढून घेत रिक्षातून पोबारा केला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित बुºहान यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास संजय होनाजी काळे (रा. विहितगाव) व पंढरीनाथ गायकवाड हे दोघे शेतकरी ट्रॅक्टरचालक सुरेश जुंद्रेच्या ट्रॅक्टरमध्ये वडाळागावातील म्हशीच्या गोठ्यामध्ये चारा विक्री करण्यासाठी आले होते. त्यावेळी वडाळा चौफुलीवर त्यांच्यासमोर बुºहान याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५, एफ यू १४२२) थांबविली. रिक्षामधून तिघांनी उतरून ट्रॅक्टरवरील शेतकºयांना बळजबरीने खाली ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दुपारी बुºहान यास अटक केली. त्याचे वडील व दाजी अद्याप फरार आहे. बुºहान यास दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही तो सर्रासपणे शहरात वावरत होता.
मध्यरात्रीचा रिक्षा ‘थांबा’
वडाळागावात निम्म्याहून अधिक लोक रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात. रिक्षाचा थांबा वडाळागावात मुख्य खंडोबा चौकात आहे. मध्यरात्री चौक सामसूम झालेला असताना वडाळागावाच्या चौफुलीवर महारुद्र हनुमान मंदिर व जॉगिंग ट्रॅकवर पाच ते सहा रिक्षा येऊन थांबत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या रिक्षांकडे गस्तीवरील पोलीस दुर्लक्ष करतात. रिक्षाचालक सर्रासपणे मद्यप्राशन करून आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करतात. तसेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक मारहाण करून नागरिकांना लुटण्यापर्यंत मजल मारत असल्याने पोलिसांनी मध्यरात्रीचा हा रिक्षा ‘थांबा’ बंद करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title:  The farmers beat the punda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.