बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:22 PM2019-04-11T19:22:48+5:302019-04-11T19:23:51+5:30

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Farmers are frightened by the screams of leopard | बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

googlenewsNext
ठळक मुद्देखेडलेझुंगे : शेतीला पाणी देण्याकरीता जातात गटा गटाने

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पाळीव कुत्रे, जनावरांवर हल्ले झालेले आहे. त्यातच येथील बोरमाथा वस्तीत वास्तव्यास असलेले योगेश साबळे यांच्या गट नंबर ४६३ मध्ये कांदा पिक काढल्यानंतर शेतात मेंढ्याचा कळप बसविलेला आहे.
बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ३ च्या सुमारास बिबट्याने शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडले. दुपारी उशिरापर्यंत वन विभागाचे संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.
बिबट्याने मानवी वसाहतीजवळ असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. शेतकरी वर्ग सकाळी उशीरा घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत.
शेतामध्ये काम करणे येथील शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. दिवसा उन्हाचा तडाखा असल्याने शेतामध्ये सायंकाळी किंवा पहाटे जीव मुठीत धरु न पाणी देण्याचे कामकाज ४-५ शेतकरी एकत्र येवुन करत आहेत. परंतु विज कंपनीकडुन शेती पंपांसाठी रात्रीच विजपुरवठा केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.
विज वितरण विभागाने दिवसा शेतीपंपासाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.

परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे नक्की सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाने परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन परिसरामध्ये पिंजरे लावुन येथील शेतकरी वर्गाला भयमुक्त करावे.
- विजय गिते,
माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.
येथील परिसरात शेती कामासाठी शेतकरी व कामगार शेती कामास येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. जादा दराने बाहेरु न कामगार उपलब्ध करावे लागत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या हल्यामुळे रहीवाशी व शेत कामगार भयभीत झालेले आहे. यापुर्वी वन्यप्राण्यांकडुन मानवी वसाहतीजवळ असे प्राणघातक हल्ले झालेले नव्हते. आज रोजी येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. तरी वन विभागाने कर्मचारी वाढवुन शेतकºयांना सहकार्य करावे.
- योगेश साबळे, शेतकरी.

Web Title: Farmers are frightened by the screams of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी