जमीन विक्र ीच्या टक्केवारीसाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:10 PM2019-02-22T13:10:46+5:302019-02-22T13:11:01+5:30

मनमाड : - वीज वितरण कंपनीला विकलेल्या शेतजमिनीच्या मिळालेल्या रक्कमेतून दलालीच्या टक्केवारीची रक्कम मागण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका-यासह तीन जणांनी तगादा लावत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना शहरात घडली.

 Farmer suicides due to harassment of land sales | जमीन विक्र ीच्या टक्केवारीसाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

जमीन विक्र ीच्या टक्केवारीसाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Next

मनमाड : - वीज वितरण कंपनीला विकलेल्या शेतजमिनीच्या मिळालेल्या रक्कमेतून दलालीच्या टक्केवारीची रक्कम मागण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका-यासह तीन जणांनी तगादा लावत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना शहरात घडली. अनिल सकाहरी कातकडे या शेतकºयाने रापली गेट जवळ रेल्वेखाली आत्महत्या केली.मयताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्र ारी वरून चार आरोपींविरु द्ध मनमाड पोलिसात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड शहरातील कॅम्प भागातील कातकडे वस्ती येथे राहणारे अनिल सकाहरी कातकडे यांची सदर भागात शेती आहे. वीज वितरण कंपनीला सबस्टेशन बांधण्याकरिता जमीन लागत होती कातकडे यांनी आपली एक एकर शेतजमिनी वीज वितरण कंपनीला विक्र ी केली होती .मात्र सदर शेतजमीन वीज कंपनीच्या अधिकाºयांना विकण्यास विलास गिरीधर हुकिरे, ऋ षिकेश मनमोहन द्विवेदी रा.मनमाड, वीज कंपनीचा अधिकारी श्री डोंगरे, बाळू सोनू गायकवाड (रा.दिंडोरी ) या चार जणांनी मदत केली होती. जमीन विकतांना मिळालेल्या पैशातून जमीन विक्र ीनंतर टक्केवारीची रक्कम मागण्यासाठी वरील चौघांना वारंवार मागणी करत असल्याने अनिल याने येथून जवळ असलेल्या रापली गेट जवळ भरधाव रेल्वेखाली आत्महत्या करत आपले जीवन संपवले असल्याची तक्र ार मायताचा भाऊ विकास सकाहरी कातकडे यांनी मनमाड पोलिसात दिली असून विलास गिरीधर हुकिरे, ऋ षिकेश मनमोहन द्विवेदी रा.मनमाड, वीज कंपनीचा अधिकारी श्री डोंगरे, बाळू सोनू गायकवाड (रा.दिंडोरी ) या चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस उपनिरीक्षक बनसोडे व पो.ह. डगळे गुन्ह्याचा तपास करत आहे.

Web Title:  Farmer suicides due to harassment of land sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक