महाराष्टÑ चेंबर घडविणार शेतकरी उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:37 AM2019-06-19T01:37:04+5:302019-06-19T01:39:17+5:30

महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ शेतकºयांना मलेशियात नेऊन तेथील उद्योग व्यवसायाची ओळख दाखविण्याचे ठरवले आहे.

Farmer entrepreneur to build Maharashtra Chamber | महाराष्टÑ चेंबर घडविणार शेतकरी उद्योजक

महाराष्टÑ चेंबर घडविणार शेतकरी उद्योजक

Next
ठळक मुद्देप्रशिक्षण : शेतीशी निगडित जोडधंदे, अन्नप्रक्रिया उद्योग वाढण्याची गरज

नाशिक : महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ शेतकºयांना मलेशियात नेऊन तेथील उद्योग व्यवसायाची ओळख दाखविण्याचे ठरवले आहे. येत्या २६ ते २८ जून दरम्यान हे प्रदर्शान होणार असून, त्यात या शेतकºयांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि ग्रो फूड प्रोसेसिंग कमिटीच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुने यांनी ही माहिती मंगळवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत दिली.
निसर्गावर अवलंबून शेतमालाला हमीभाव नाही आणि बाजारपेठेत आवश्यक तो किमान भावदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित जोडधंदे आणि अन्नप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे.
दौºयात एकूण ११६ प्रतिनिधींचे हे शिष्टमंडळ जाणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागातून बागाईतदार, शेतकरी आणि खाद्यपदार्थ उत्पादक व्यावसायिकसुद्धा समाविष्ट झाले आहेत. यावेळी चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, ब्रिजमोहन चौधरी उपस्थित होते.
शेतकºयांना उपक्रमातून प्रेरणा मिळावी
मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, जपान अशा पूर्वेकडील देशांनी खाद्यपदार्थ आणि खाद्यप्रक्रि या यासंदर्भात खूप मोठी प्रगती केली असून, फूड व फूड प्रोसेसिंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तेथे अधिक वापर होतो. त्यामुळे या शेतकºयांना तेथील ज्ञान मिळावे. माहितीचे आदान-प्रदान व्हावे आणि महाराष्टÑात अशाप्रकारचे उद्योग साकारून अन्य शेतकºयांना त्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा दौरा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Farmer entrepreneur to build Maharashtra Chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.