खोटं फेसबुक अकाऊंटवरून महिलेशी अश्लील संवाद अन् फोटो थेट पतीच्या फेसबूकवर पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:02 PM2017-10-24T16:02:02+5:302017-10-24T16:02:47+5:30

False posting from Facebook account to a woman pornographic photo and photo directly on Facebook | खोटं फेसबुक अकाऊंटवरून महिलेशी अश्लील संवाद अन् फोटो थेट पतीच्या फेसबूकवर पोस्ट

खोटं फेसबुक अकाऊंटवरून महिलेशी अश्लील संवाद अन् फोटो थेट पतीच्या फेसबूकवर पोस्ट

Next
ठळक मुद्देखोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटद्वारे एका महिलेसोबत संवाद

नाशिक : खोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटद्वारे एका महिलेसोबत संवाद साधत हळुहळु संवाद अश्लीलतेकडे घेऊन जात व सदर महिलेचे फोटो हे खोट्या अकाऊंटवरून तीच्या पतीच्या अकाऊंटवर पोस्ट केल्याप्रकरणी एका फेसबुक युजर्सवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी करण श्रावण पवार (आंबवडगाव. ता. पाचोरा) याने आकाश वाघ या खोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट ओपन करुन त्याद्वारे मेनरोड परिसरात राहणाºया एका महिलेसोबत चॅटिंग केली. तसेच महिलेचा पती व पतीच्या मित्राच्या अकाऊंटवरदेखील महिलेचे छायाचित्र पोस्ट करुन तिच्याविषयी बदनामीकारक असा संवाद साधल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर संशयित पवार हा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून या महिलेला फेसबूकवरुन त्रास देत होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे करीत आहेत.


 

Web Title: False posting from Facebook account to a woman pornographic photo and photo directly on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.