पोषण आहाराची खोटे बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:15 PM2018-05-22T14:15:02+5:302018-05-22T14:15:02+5:30

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

 False bills of nutrition | पोषण आहाराची खोटे बिले

पोषण आहाराची खोटे बिले

googlenewsNext

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या आवळी परिसरातील जंगलात अनेक आदिवासी कुटुंब आपला उदरिनर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या वाडी वस्त्यांवर या कुटुंबांची ० ते ६ वयोगटांतील एकूण २४ बालके असून त्यांची शासकीय दप्तरी आवळी,सातूर्ली, ओंडली आदी गावच्या अंगणवाडी केंद्रांत नोंद आहे. एकीकडे राज्य शासन कुपोषणावर मात करण्यासाठी लाखो रु पयांचा निधी देत असताना मात्र तरीही शासनाचा कुठलाही पोषण आहार या बालकांना मिळाला नसल्याची तक्र ार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलिसांत दाखल केली आहे.
--------------------
याबाबतची माहिती इगतपुरी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प च्या संबंधितांना मिळताच प्रकल्प अधिकारी एस एस ढाकणे यांनी ठिकाणी धाव घेऊन पोषण आहार त्या बालकांना दिला. या पुढे नित्यनियमाने पोषण आहार बालकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. ज्या कुणी अंगणवाडी सेविकेने या बालकांच्या नावे खोटे बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.
---------------------
इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात पोषण आहार बालकांना वेळेवर मिळत नाही. गरीब आदिवासी वाट बघून असतात,त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचत नाही. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी राज्य शासन पोषण आहारावर लाखो रु पयांची तरतूद करते मात्र शासकीय अधिकारी यंत्रणेच्या डोळेझाक पणामुळे ते वडी वस्त्यांवर पोहोचत नाही. खोटी बिले दाखवून फसवणूक केली जाते. कठोर कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.
-भगवान मधे, श्रमजीवी संघटना

Web Title:  False bills of nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक