नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:32 AM2018-03-08T01:32:33+5:302018-03-08T01:32:33+5:30

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Export of 4500 container grapes from Nashik | नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ१० ते १५ टक्के द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्यावर्षी द्राक्षांचे उत्पादन वाढूनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे द्राक्षांना अपेक्षित भाव मिळाला नाही. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्णातून हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षबागायतदारांनी निर्यातीवर अधिक भर देत इंग्लंड, युरोप रशियासह अन्य देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली. त्यामुळे नंतरच्या काळात द्राक्षांच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्याचा फटक ा द्राक्षनिर्यातीला बसला नाही. बहुतांश मालाची निर्यात अंतिम टप्प्यात आली असताना आता देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले असून, मार्चअखेर द्राक्षांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना ६१ ते ८० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ३० रुपयांपासून ५०-५५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यात जसजसे बागांचे प्रमाण कमी होईल व तपमानात वाढ होईल त्याप्रमाणे वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दरही वाढतील, असा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
ओखी वादळाचा फटका व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे यावर्षी द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. शेतकºयांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. त्यामुळेच नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकºयांना शक्य झाले.
- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

Web Title: Export of 4500 container grapes from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.