नववधूचे मुद्देमालासह पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:24 AM2018-05-28T01:24:26+5:302018-05-28T01:24:26+5:30

वय उलटून गेल्यानंतरही वधू मिळत नसल्याचे पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी एजेंटामार्फत लग्न लावून आणलेल्या वधूने मुद्देमालासह धूम ठोकल्याची चर्चा बागलाण तालुक्यात सुरु आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात कोणतीही खबर नसली तरी ही घटना खरी असून बागलाण तालुक्यातील चौगाव येथीला हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.

 Escape with the issue of bridegroom | नववधूचे मुद्देमालासह पलायन

नववधूचे मुद्देमालासह पलायन

Next

सटाणा : वय उलटून गेल्यानंतरही वधू मिळत नसल्याचे पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी एजेंटामार्फत लग्न लावून आणलेल्या वधूने मुद्देमालासह धूम ठोकल्याची चर्चा बागलाण तालुक्यात सुरु आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात कोणतीही खबर नसली तरी ही घटना खरी असून बागलाण तालुक्यातील चौगाव येथीला हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.  चौगाव येथील एका युवकाला वय उलटून गेल्यानंतरही वधू मिळत नव्हती. मुलाच्या कुटुंबीयांनी अखेर नांदेड येथील एजेंटाची मदत घेवून नांदेड येथील एका अल्पवयीन मुलीशी सबंधित युवकाचे लग्न लावण्यात आले. यासाठी वधूच्या कुटुंबियांना दीड लाख, वधूला सोन्याचे दागिने आणि एजेंटला काही रक्कम देखील देण्यात आली होती. ज्या दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्र म झाला त्याच दिवशी लग्नाची बोलणी होवून हळद आणि लग्न पार पडून मुलीला थेट चौगाव येथे आणण्यात आले. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी या अल्पवयीन विवाहीतेने मध्यरात्री घरातून पळ काढला. ही विवाहिता ताहाराबाद रोडवरील डांग्या मारु ती परिसरातून एकटी जात असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. एवढ्या मध्यरात्री एक मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचे पाहून मंदिराजवळ बसलेल्या शेतकºयांनी तिची विचारपूस केली असता तिने नांदेड येथील असल्याचे सांगत माझा बळजबरी विवाह केल्याने मी पळून आल्याचे सांगितले. सबंधित शेतकºयांनी सटाणा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देत त्या मुलीला पोलिसांच्या हवाली केले.  मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार सबंधित कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्या कुटुंबियांसमवेत जाण्यास तिने सहमती दिल्याने पोलिसांनी तिला त्या कुटुंबियांच्या हवाली केले. मात्र दुसºयाच दिवशी तिने रोख रकमेसह दागिने घेवून पोबारा केला असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान हा नियोजित कट असल्याचे देखील बोलले जात असून सबंधित कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्र ार दाखल केलेली नाही.

Web Title:  Escape with the issue of bridegroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.