वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:50 PM2017-11-26T23:50:51+5:302017-11-27T00:36:00+5:30

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून धार्मिकस्थळे हटविण्यात आली, परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण केव्हा काढणार, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी केला आहे.

Encroachment of professionals on the Wadala-Pathardi road | वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

googlenewsNext

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून धार्मिकस्थळे हटविण्यात आली, परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण केव्हा काढणार, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी केला आहे.  नागपूरच्या धर्तीवर वडाळा नाका ते पाथर्डी चौफुलीदरम्यान वडाळा-पाथर्डी रस्ता करण्यात आला. त्यासाठी लाख रुपये महापालिकेने खर्च केले. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस पादचाºयांसाठी पदपथ रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येऊन वाहतुकीवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजकही टाकण्यात आले.  तसेच दुभाजकामध्ये खजुराचे आणि शोभिवंत वृक्ष लावल्याने सौंदर्यात भरच पडली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल, असे वाटले होते. परंतु काही काळ गेला आणि शिवाजीवाडी ते पांडवनगरी, वडाळा-पाथर्डी लगतच्या दोन्ही बाजूला काही व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकाम करून ओटे बांधून अतिक्रमण केल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने सर्रासपणे रस्त्यावरच लावतात, त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाºयांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडून हमरी-तुमरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी आहे की व्यावसायिकांसाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, कलानगर, सदिच्छानगर, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असते. परंतु व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  जॉगिंग ट्रॅक ते शंभरफुटी रस्ता, मोदकेश्वर चौक ते बापू बंगला, श्रीराम चौक ते राणेनगर चौफुली या परिसरात अंतर्गत व मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकामाचे ओटे बांधून अतिक्रमण केले आहे.

Web Title: Encroachment of professionals on the Wadala-Pathardi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.