सिडको,अंबड भागातील रस्ते, चौक परिसरांत हातगाडीचालकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:47 AM2017-11-14T00:47:01+5:302017-11-14T00:50:00+5:30

महापालिकेच्या वतीने सिडको भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले असलेतरी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी मुख्य रस्ते तसेच चौक परिसरांत सकाळ व सायंकाळच्या सुमारास भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यालगतच बसून आपला व्यवसाय थाठत असल्याने याबाबतही मनपाने ठोस पावले उचलत त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Encroachment of Handicrafts in CIDCO, Ambad area, Chowk area | सिडको,अंबड भागातील रस्ते, चौक परिसरांत हातगाडीचालकांचे अतिक्रमण

सिडको,अंबड भागातील रस्ते, चौक परिसरांत हातगाडीचालकांचे अतिक्रमण

googlenewsNext
ठळक मुद्दे भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यातचवाहतुकीस अडथळा होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढलेशाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी

सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले असलेतरी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी मुख्य रस्ते तसेच चौक परिसरांत सकाळ व सायंकाळच्या सुमारास भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यालगतच बसून आपला व्यवसाय थाठत असल्याने याबाबतही मनपाने ठोस पावले उचलत त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.  सिडको भागातील जुने सिडको, दत्तचौक, पवननगर, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, अंबड, खुटवडनगर, माउली लॉन्स व परिसरात सकाळ व सायंकाळच्या वेळी भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यातच बसून आपला व्यवसाय थाटत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने याबाबत दक्षता घेऊन रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली आहे. सिडको तसेच परिसरातील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाºयांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातही घडत आहे. याआधी वाहतूक शाखा व अंबड पोलिसांच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरणाºया अनधिकृत हातगाडी व्यावसायिकांना हटविण्यात आले आहे, परंतु यानंतरही पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय केला जातो. उंटवाडी पुलाजवळील मुख्य रस्त्यावरही फळविक्रेते व इतर अनेक हातगाडी व्यावसायिक दुकान थाटून व्यवसाय करीत आहे. त्रिमूर्ती चौकात मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून भाजीपाला, फळविक्रेते व हातगाडीवर व्यवसाय करणाºयांची संख्या वाढली आहे. याच भागात शाळादेखील असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांमुळे वाहतूक कोंडी होते व यामुळे अनेकदा अपघातही झाले. तसेच मुख्य चौका-चौकांत रिक्षाचालकही रस्त्यातच रिक्षा उभी करून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. याबरोबरच माउली लॉन्स चौकातही दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, याबाबत प्रभागाच्या नगरसेवक सुवर्णा मटाले येथील अतिक्रमणाबाबत प्रभाग सभेत कायम प्रश्न उपस्थित करतात. सिडकोतील मुख्य चौक तसेच रस्त्यालगत व्यवसाय करणाºयांना मनपाने शिस्त लावण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कधीतरी वरवर मोहीम राबविण्यात येत असली तरी मोहिमेनंतर पुन्हा दुसºया दिवशी रस्त्यावरील अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. 
सायंकाळी रस्त्यावर अडथळा 
सायंकाळच्या सुमारास तर सर्रासपणे रस्त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने हातगाडी तसेच भाजीपाला व्यावसायिक ठाण मांडत व्यवसाय करताना दिसतात. कार्यालयीन वेळ झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाने कारवाई करणे गरजेचे आहे.

Web Title: Encroachment of Handicrafts in CIDCO, Ambad area, Chowk area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.