उंटवाडी प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:26 AM2018-12-22T00:26:44+5:302018-12-22T00:27:15+5:30

नाएसोच्या प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत ३२वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते.

 Encourage the enthusiasm of UNTWADI elementary school | उंटवाडी प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

उंटवाडी प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next

सिडको : नाएसोच्या प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत ३२वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे व कार्यवाह राजेंद्र निकम उपस्थित होते.
देवरे यांनी पालकांनी आपल्या पाल्यास मराठी शाळेतच शिक्षण घेणे कसे हितकारक आहे सांगितले. शाळेतील सेमी इंग्रजी वर्गामुळे इंग्रजीचाही अभ्यास होतो. त्यामुळे इंग्रजीतून शिक्षण घेण्याचा आग्रह न ठेवता मराठीतून शिक्षण घ्यावे, असे पालकांना सांगितले. संस्था उपाध्यक्ष दिलीप फडके यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजश्री खोडके यांनी केले. विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केली. यात भांगडा, दांडिया, कोळीगीते आदी नृत्य सादर केली.अहवाल वाचन शिक्षक प्रतिनिधी विद्या ठाकरे यांनी केले. यावेळी स्वाती परचुरे, सुरेखा बोकडे, वैशाली फडके, नीला निमोणकर, सुनीता ठाकूर, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष मनीषा काथोके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Web Title:  Encourage the enthusiasm of UNTWADI elementary school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.