महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:27 AM2018-04-30T00:27:32+5:302018-04-30T00:27:32+5:30

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.

Empress of the journey of the common man on the day of Maharashtra! | महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

Next
ठळक मुद्देएअर डेक्कनची बुकिंग सुरूनागरिक मात्र अद्यापही साशंक

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.
केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशा दोन शहरांसाठी एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली आहे. परंतु गेल्या डिसेंबर महिन्यापासून ही सेवा रडत खडत सुरू असून, मुंबई नाशिकच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक ते पुणे सेवा मात्र त्या प्रमाणात सुरुळीत असली तरी मुंबई सेवेला मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यातच कंपनीने १५ मार्चपासून आठ दिवसांसाठी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतरदेखील एकेक मुहूर्त देणे सुरूच ठेवले परंतु सेवा सुरू झाली नाही. कंपनीने उड्डाणअंतर्गत प्रादेशिक हवाई जोडणीची अनेक मार्गांवर सेवा सुरू करण्याची तयारी केली असल्याने व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर तसेच पुणे-जळगाव अशा अन्य मार्गांसाठी सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याही प्रकार यादरम्यान चर्चेत आला आणि विमानसेवा स्थगित ठेवण्यात आली होती. आता मात्र ही सेवा महाराष्टÑ दिनी पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
कंपनीने संकेतस्थळावर बुकिंग सुरू केले असून, १ पासून बुकिंगसाठी १ हजार ३४९ रुपयांचे भाडे दर्शविले आहे. सुधारित वेळेनुसार म्हणजे सकाळी ६ वाजता ओझरच्या विमानतळावरून विमानोड्डाण होईल आणि ६ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला पोहोचेले असे दाखवले जात आहे. त्यामुळे ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, विमानसेवेसाठी आग्रह धरणाºयांना देखील याबाबत खात्री नाही. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. कंपनीने अनेकदा मुहूर्त घोषित केले असल्याने त्यांनी ही शंका ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.केंद्र सरकारची योजना, मग सुरळीत का नाही?नाशिकच्या विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्यानंतरदेखील यापूर्वी ही सेवा सुरू झाली नव्हती. मात्र, केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई जोडणीसाठी उड्डाण योजना घोषित केली आणि विमान कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. मात्र असे असेल तर मग योजना सुरळीत का नाही आणि स्पर्धात्मक बोलीतून रुट््स मिळवणाºया कंपन्यांनी दिरंगाई केली तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? असा प्रश्न केला जात आहे.

Web Title: Empress of the journey of the common man on the day of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.