तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:05 PM2018-12-12T17:05:38+5:302018-12-12T17:05:59+5:30

नाशिक : तपोवनातील नदीजवळ जुगार खेळणा-या अकरा जुगा-यांना भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़११) सायंकाळी छापा टाकून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ...

Eleven Juga playing gambling in Tapavane arrested | तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक

तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक

Next
ठळक मुद्देजुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : तपोवनातील नदीजवळ जुगार खेळणा-या अकरा जुगा-यांना भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़११) सायंकाळी छापा टाकून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

भद्रकाली पोलिसांना तपोवनात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित मजहर फिरोज पठाण (२७, रा. जहॉगीरदार वाडा, हरीनगरी, द्वारका), इम्रान मेहबूब शेख (३३), मजहर गयास सय्यद (२६), अजिम सत्तार सय्यद (रा. महात्मा फुले चौकीसमोर, बागवानपुरा), नवाज, मोसीन टकल्या, भैया, गोपी (पूर्ण नावे माहीत नाहीत. चौघे रा. कथडा), अमजद (पूर्ण नाव माहीत नाही. रा. हरीमंजिल, बागवानपुरा), बब्बू शेख (नाव व पत्ता माहीत नाही), मोसीम बिर्याणीवाला (रा. हरीमंजिल, बागवानपुरा) हे अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ या संशयितांकडून ९३० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Eleven Juga playing gambling in Tapavane arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.