खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:38 AM2019-06-11T00:38:46+5:302019-06-11T00:40:01+5:30

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.

Early start | खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देवातावरणात बदल : जिल्ह्यात बळीराजाची विविध कामांची लगबग


वेध शाळेपाठोपाठ निसर्गाच्या हालचालीवरून पाऊस जवळ आल्याचे संकेत मिळताच देशवंडीत सुताराच्या अंगणात शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग.

 

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.
लग्नसमारंभाची धामधूम संपून उन्हाचीही तीव्रता काहीअंशी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले आहे. नायगाव खोºयात खरीपपूर्व मशागतींचे कामांची सध्या लगबग सुरू आहे. जून महिना सुरू झाला आहे. उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन थोड्यााच दिवसात होणार असल्याचे भाकीत वेध शाळेबरोबर वातावरणातील बदलावरून दिसत आहे. शेतकºयांना सध्या खरीपाचे वेध लागले आहे. मशागतीचे कामे सुरू झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात नजरेस पडत आहे. सध्या लागवडीसाठी तयार झालेल्या जमिनीवर रोपवाटिका बनविण्यासाठी मेहनत सुरू आहे. यंदा पावसाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने यावर्षी शेतकरी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणाºया पिकांची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार वाºयाने शेतकºयांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. जोराच्या हवेने पाऊस लवकर येईल किंवा लांबणीवर जाईल अशी दोन्ही भाकिते शेतकरी करत आहेत. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतकºयांत संभ्रम आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प व शेवटच्या टप्प्यात झालेल्या कमी पावसामुळे यावर्षी प्रथमच नायगाव खोºयात तीव्र पाणीटंचाई भासली. परिसरातील विहिरी यावर्षी पहिल्यांदाच कोरड्या पडल्या आहेत.
जून महिन्याच्या मध्यावर पाऊस होणार असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठीचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग-मठ, उडीद आदींसह विविध बियाणे खरेदीसाठी तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगे आदी पिकांच्या रोपांची लागवडीसाठी नर्सरीत किंवा आपल्याच शेतात तयार करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.
खरिपाच्या लगबगीने शेतशिवार गजबजून गेले असताना शेतीच्या मशागतीचे लाकडी नांगर, वखर, पांभर, जू आदी साहित्यांच्या डागडुजीसाठी खेडेगावातील सुतारांच्या न्याहावर शेतकºयांची गर्दी दिसू लागली आहे. गतवर्षी कमी का होईना पाऊस वेळवर सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र अत्यल्प पाण्यावर पिकविलेल्या वर्षभर कोणत्याच भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. खरिपापाठोपाठ रब्बीच्या कांद्यानेही वांदा केला आहे.
वातावरणातील उष्णता कमीसध्या हवामानातील बदल झपाट्याने घडत असल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. दिवसागणिक होणारे बदल पावसाचे स्पष्ट संकेत देत आहे. त्याच प्रमाणे कावळ्यांची घरटे बांधण्याची लगबग दिसत आहे. मुंग्याचीही अन्यधान्य साठवणीच्या कामाची लगबग नजरेस पडत आहे. यावरून यंदा वेधशाळेपाठोपाठ मिळत असलेले नैसर्गिक संकेत खरे ठरो आणि कष्टकरी बळीराजाला निदान पावसाचे तरी अच्छे दिन येवो.

Web Title: Early start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी