ताहाराबाद : द्वारकाधीश साखर कारखान्याने ऊस विकासामध्ये विविध योजना राबवून केलेला ऊस विकास अभिनंदनास पात्र आहे. कारखान्याचे व्यवस्थापन व स्वतंत्र ऊस कक्षाची कर्तव्यदक्षता विचारात घेऊन राज्यातून ऊस पीक संशोधन व विकासासाठी द्वारकाधीश साखर कारखाना आम्ही दत्तक घेत आहोत, असे मध्यवर्ती ऊस संशोधन संस्थेचे ऊस विशेषज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी जाहीर केले.
भारतीय शुगर पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील ‘भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार’ हा सन्मान कार्यकारी संचालक सचिन सावंत यांना मिळाला. त्याप्रीत्यर्थ द्वारकाधीश साखर कारखान्यावर ऊस उत्पादक मेळावा व ऊस विकास परिषद झाली, त्याप्रसंगी सोळंके बोलत होते. सोळंके व डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे दोन हजार ऊस उत्पादकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सोळंके यांनी रोपमळा निर्मिती, कीड नियंत्रण, पाण्याचे नियोजन, उसाच्या वेगवेगळ्या विभागनिहाय व कालनिहाय लागण व संगोपन याविषयी यथोचित मार्गदर्शन केले. स्वत: कारखाना प्रक्षेत्रातील ऊस पीक पाहणी करून कामकाज व कर्तव्यदक्षतेबाबत समाधान व्यक्त करून द्वारकाधीश साखर कारखाना ऊस विकासासाठी समर्थ आहे म्हणून आमची संस्था कारखान्यास दत्तक घेत आहे. कार्यक्र माचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले. दिवसेंदिवस शेतीच्या विभाजनामुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे झाले.
निसर्गकोपाने ऊस क्षेत्रात वाढ होत नाही यासाठी पर्याय म्हणून उसाचे एकरी उत्पादन वढविणे हा एकच मूलमंत्र उत्पादकांनी अंगीकारावा, असे उत्पादकांना आवाहन केले. उत्पादकांनी गट शेती संकल्पना राबवावी, त्यासाठीचा सर्व खर्च कारखाना देईल व गळीतास आलेल्या उसामधून बिनाव्याजी वसूल केला जाईल. याप्रसंगी सचिन सावंत यांचा विविध संस्था व मान्यवरांनी सत्कार केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.