दाभाडीत प्लॅस्टिकबंदीसाठी जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 07:50 PM2018-08-19T19:50:20+5:302018-08-19T19:51:09+5:30

मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर्णयाचे स्वागत करत ग्रामसभेत प्लॅस्टिकबंदीबाबत ठराव करण्यात आला.

Dustproof Plastics | दाभाडीत प्लॅस्टिकबंदीसाठी जागर

दाभाडीत प्लॅस्टिकबंदीसाठी जागर

Next
ठळक मुद्देग्रामपालिकेतर्फे नागरिक व व्यावसायिकांचे प्रबोधन

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर्णयाचे स्वागत करत ग्रामसभेत प्लॅस्टिकबंदीबाबत ठराव करण्यात आला.
प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम टळावेत, नागरिकांचे आरोग्य सुधारावे, प्रदूषण कमी व्हावे, नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जनप्रबोधन करण्यात येत आहे. गावातील सर्व व्यावसायिक, दुकानदार यांना प्लॅस्टिक वापराबाबत अवगत करून प्लॅस्टिक बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रत्येकाला स्वतंत्र सूचनापत्र देण्यात आले आहे तसेच प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास पाच ते २५ हजार रुपये दंड आकारण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर स्वत: सरपंच, उपसरपंच, ग्रामपालिका सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांनी गावातून फेरी काढत नागरिक व व्यावसायिकांना अवगत करीत आहेत. यावेळी दुकानदारांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. शंभर टक्के प्लॅस्टिकचा वापर बंद होण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिक बंद जागृती फेरी काढण्यात आली. यात पालक, शिक्षक व शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत फलकांच्या साहाय्याने नागरिकांना आवाहन केले. ग्रामपालिकेने संपूर्ण गावात फलक व सूचनांचे लेखन करत प्लॅस्टिकबंदीचा जागर केला आहे. प्रत्येक नागरिकांच्या घराला प्लॅस्टिकबंदीबाबत स्टिकर चिटकविण्यात आले आहेत. खास करून महिलांचा सहभाग लाभावा यासाठी बचतगट, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला मंडळ यांच्या मदतीने जागृती केली जात आहे. तसेच शासकीय व ग्रामपालिका कर्मचारी यांच्याकडून प्रबोधनपर मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्यक्ष सूचनांचे पालन केलेले न आढळल्यास दंड देत प्लॅस्टिकबंदीबाबत कठोर भूमिका घेतल्याने नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
आढळल्यास दंड
प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम टळावेत, प्रदूषण कमी व्हावे, नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी जनप्रबोधन करण्यात येत आहे. व्यावसायिक, दुकानदार यांना प्लॅस्टिक वापराबाबत अवगत करून प्लॅस्टिक बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रत्येकाला स्वतंत्र सूचनापत्र देण्यात आले आहे. तसेच प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास पाच ते २५ हजार रुपये दंड आकारण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Dustproof Plastics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.