पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:21 PM2019-07-16T19:21:49+5:302019-07-16T19:22:17+5:30

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे.

Due to the incessant rains of rain ... | पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

Next
ठळक मुद्देखेडलेझुंगे : पिके पिवळी होण्यास सुरुवात ; एकरी उत्पन्न घटण्याची भीती

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे. सद्यस्थितीत बाजरी, उडीद, कापुस आण िसोयाबीन यांची स्थीती ठिक आहे. सतत पडत असलेल्या पासामुळे पिकांमध्ये तणांची जोमाने वाढ झालेली होती. त्यामुळे पिकांवर विविध रोग, किड आली होती. द्राक्षबागा व इतर फळबागा मशागतीचे कामांनी वेग घेतलेला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासुन पावसाने उघड दिल्याने निंदणी आणी फवारणी सारख्या कामांनी वेग घेतला आहे. कुठे मजुरांच्या सहाय्याने निंदणी सुरु आहे तर कुठे यंत्रंच्या सहाय्याने कोळपणी सुरु आहे.
१) यावर्षी आम्ही सोयाबीन, मका, तुर, मुग, कापुस यांची पेरणी केली. पेरण्या चांगल्या साधल्या. पाऊस सदेखिल वेळेवर आला, परंतु जास्त झाल्याने पिकांची मशागतीची कामे राहुन गेली त्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला जमिनीत ओल जास्त राहील्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला असुन ही पिके हातातुन 80 टक्के गेलेली आहे.
- विजय गिते, शेतकरी, खेडलेझुंगे.

२) पेरणी आगोदर पाऊस चांगला झाला. त्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पेरणीनंतर देखील पाऊस चांगला आण िवेळेवर आला पण त्यानंतर पावसाने जी आघाडी उघडली ती काही केल्या थांबली नाही. तरी देखील पिके तग धरु ण उभी आहेत. तुर आण िमुग पिकांची सरासरी उत्न्नहे घटणार असुन सोयाबीन कापुस आण िउडीद यांची स्थीती चांगली आहे. आता पावसाने उघड दिल्याने राहिलेली कामे उरकुन घेण्याकडे आमचा कल आहे.
- रामदास गोरडे, शेतकरी, खेडलेझुंगे.

३) जास्त पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळी पडली होती. आणखी तीन-चार दिवस जर पाऊस सतत लागुन राहीला असता तर सर्वच पिके सडण्याच्या धोका निर्माण झाला होता. परंतु लीन-चार दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकर्यांना धीर आला आहे.
- शशिकांत चव्हाण, शेतकरी, रु ई-धानोरे.
 

Web Title: Due to the incessant rains of rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी