नाशिकला अवैध गाड्या पार्कींगमुळे सीबीएस परिसरात वाहतुक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:54 PM2017-11-23T12:54:45+5:302017-11-23T12:59:22+5:30

Due to illegal vehicles parking in Nashik, traffic congestion in CBS area | नाशिकला अवैध गाड्या पार्कींगमुळे सीबीएस परिसरात वाहतुक कोंडी

नाशिकला अवैध गाड्या पार्कींगमुळे सीबीएस परिसरात वाहतुक कोंडी

Next
ठळक मुद्दे ंवाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष‘वन वे’, ‘नो पार्कींग’ च्या नियमांना केराची टोपली


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक- जुने सीबीएस, ठक्कर बजार, मेळा स्टॅँड या बसस्थानकांना सध्या अवैध गाड्या पार्कींगचा विळखा पडला असून बसचालक, पादचारी यांना मार्गक्रमण करणे जिकीरीचे झाले आहे. वाहतुक पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्र्यंबकरोडवरुन ठक्कर बझारमार्गे सीबीएस हा मार्ग एकेरी असूनही येथे सर्रास दुहेरी वाहतुक सुरु असून प्रवासी, ठक्कर बझारमधील व्यावसायिक, ग्राहक रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करत असल्याने वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
मध्यंतरी ठक्कर बझार संकुलातील दुकान मालकाचे चारचाकी लावण्यावरुन भांडण झाल्याची घटना घडली होती.
येथे असणारे दुकान मालक, ग्राहक दिर्घकाळ आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावून बिनधास्तपणे निघून जात आहेत. त्या गाड्यांच्या पुढे आणखी गाड्याला लागत असल्याने वाहतुकीसाठी कमी जागा उपलब्ध होत आहे.या रस्त्यावर दोन्ही बाजुने गाड्या उभ्या असल्याने आणि त्यातच रॉंग साईडने रिक्षा, टॅक्सी, बाईक, स्कूटर आणि प्रवासी यांची एकाचवेळी येजा सुरु असल्याने बसचालकांना गाडी काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर निर्धारित संख्येपेक्षा जास्त रिक्षा थांबत असल्याने बसचालकांना स्थानकातुन बस बाहेर काढणे जिकीरीचे झाले आहे.मध्यवर्ती बसस्थानकात बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांना हे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारात आर्थिक लुट करत असल्याचेही बरेचदा दिसुन येत आहे.निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्येने आणि बेशिस्तपणे रिक्षा संपुर्ण सीबीएस परिसरात उभ्या केलेल्या दिसत असल्याने सिग्नल सुटल्यावरही अडथळे पार करत गाड्या पुढ्या न्याव्या लागत आहेत.

Web Title: Due to illegal vehicles parking in Nashik, traffic congestion in CBS area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.