ठळक मुद्दे काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून एका अज्ञात सोनसाखळीचोरअंधाराचा फायदा घेत या भागात सोनसाखळी चोरट्यांनी लक्ष केंद्रीत

नाशिक : उच्चभ्रू वसाहत म्हणून नव्याने उदयास येणारा अशोका मार्गाच्या परिसरावर मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी वक्रदृष्टी केली असून सातत्याने सोनासाखळ्या ओरबाडण्याचा सिलसिला या परिसरात सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे अशोका मार्ग सोनसाखळी चोरीचे केेंद्र बनल्याचे बोलले जात आहे.
अशोकामार्गावरून गेल्या मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छाया बापुराव व्यवहारे या त्यांच्या कन्या प्रिती उत्तरवार यांच्यासोबत शतपावलीसाठी बाहेर पडल्या. दरम्यान, घरी परतताना एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून एका अज्ञात सोनसाखळीचोर तरूणाने व्यवहारे यांच्या गळ्यामधील पंधरा ग्रॅम वजनाची सुमारे तीस हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. उत्तरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सोनसाखळीचोरट्याविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्ग परिसरातील रहिवाशी रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने शतपावलीसाठी बाहेर पडतात. यामध्ये महिलांची संख्या अधिक असते. यावेळी रस्त्यावरील मिणमिणत्या दिव्यांप्रमाणे पथदीपांमुळे महिलांना वाटही दिसत नाही आणि दुचाकीस्वारांनाही रस्त्यावरील अनेकदा अंदाज येत बांधणे अवघड होते. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. तसेच अंधाराचा फायदा घेत या भागात सोनसाखळी चोरट्यांनी लक्ष केंद्रीत करुन सातत्याने महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा ‘प्रताप’ सुरूच ठेवला आहे. या घटनेअगोदर एक जेष्ठ महिला घरी जाताना चोरट्यांनी रात्री त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता.