गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:26 PM2019-07-16T19:26:23+5:302019-07-16T19:26:37+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.

Drinking Water Disaster at Gangwadi | गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

googlenewsNext

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.
केवळ समृद्धी महामार्गाच्या खोदकाम कामकाजामूळे येथील सार्वजनिक विहिरीवरचा ग्रामस्थांसाठी असलेला रस्ता बंद झाला व सदर खोदलेल्या भागामुळे खड्ड्यातील विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी या ग्रामस्थांना मिळत नाही.
तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या पर्यायी मार्गाने जवळपास चार किलोमीटर दूर अंतरावरून सुविधा केलेले पाणी तीन चार दिवसानंतर येथील वाडीतील पाण्याच्या टाकीत येते परंतु सदर पाण्याची देखील दुरवस्था झालेली असल्याने येथील ग्रामस्थांना ते पाणी सुद्धा गढूळ स्थितीत मिळत आहे.
परिणामी येथील ग्रामस्थ याच पाण्यावर अवलंबून आहेत.स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी देखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे.तरी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा व हा मूलभूत प्रश्न स्थानिक प्रशासनाने व लोप्रतिनिधी यांनी लवकरात सोडवावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रि या :
चालू वर्षी सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असतांना भर उन्हाळ्यात आमच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केलीच परंतु ऐन पावसाळ्यात देखील आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर याच्या सारखं दुसरं दुर्दैव कुठलं समजावं.आता तरी हा तीव्र ज्वलंत प्रश्न सोडवावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.
- जगदीश डगळे (ग्रामस्थ गंभीरवाडी)

फोटो : समृद्धी महामार्गाच्या खोदकामामुळे गंभीरवाडीतील सार्वजनिक विहिरीत साचलेले पावसाचे गढूळ पाणी तर दुसर्या छायाचित्रात समृध्दी महामार्गाचे झालेले खोदकाम.
(फोटो स्वतंत्र पाठवतो.)

Web Title: Drinking Water Disaster at Gangwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.