पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:56 AM2018-12-19T00:56:59+5:302018-12-19T00:57:24+5:30

नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़

 Drinking liquor from the car in Panchvati | पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त

पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त

Next

पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ दरम्यान, या मद्याची वाहतूक करणारा संशयित बाळू विष्णू बर्डे (आडगाव) यास अटक करण्यात आली आहे़  नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील काही हॉटेल्समध्ये आडगाव येथील वसंतदादानगर परिसरात राहणारा संशयित बाळू बर्डे हा मंगळवारी दुपारच्या सुमारास ओम्नी कारमधून (एमएच १५, डीएम ६९६५) दारू पुरविणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती़ या कारमध्ये देशी दारू भरलेले १८ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित बर्डे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गुन्हे शोध पथकाची कामगिरी
पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अरुण गायकवाड, संजय पाटील, बाळकृष्ण ठाकरे, सुरेश नरवडे, संदीप शेळके, मयूरी गांगुर्डे, उत्तम खरपडे, सागर पांढरे आदींनी नवीन आडगाव नाका परिसरात सापळा रचून ओम्नी कार अडवून तपासणी केली़

Web Title:  Drinking liquor from the car in Panchvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.