बंधारपाड्यात भरदिवसा बिबट्याचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:10 AM2019-01-16T01:10:01+5:302019-01-16T01:14:39+5:30

कळवण : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंधारपाडा या आदिवासी गावात भरदुपारी बिबट्याने दहशत माजवून आदिवासी युवकावर हल्ला चढविला तर त्याला अटकाव करणाºया अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाही जखमी केल्याची घटना घडली आहे.

Dreadful fever in Bundarpada | बंधारपाड्यात भरदिवसा बिबट्याचा थरार

बंधारपाड्यात भरदिवसा बिबट्याचा थरार

Next
ठळक मुद्देदहशतीचे वातावरण : पोलीस अधिकाऱ्यासह युवकावर हल्ला

कळवण : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंधारपाडा या आदिवासी गावात भरदुपारी बिबट्याने दहशत माजवून आदिवासी युवकावर हल्ला चढविला तर त्याला अटकाव करणाºया अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाही जखमी केल्याची घटना घडली आहे.
बंधारपाड्यात बिबट्यासह आदिवासी युवक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा सिनेस्टाइल थरार दुपारी बघायला मिळाला. बंधारपाडा भागातील आदिवासी बांधव गेल्या दोन-तीन दिवसांपासून भीतीच्या छायेखाली वावरत होते. मंगळवारी (दि. १५) दुपारी २ वाजेच्या सुमारास बिबट्याने बंधारपाडा गावात घुसून दहशत निर्माण केली. यावेळी बिबट्याने पिंट्या जगताप या आदिवासी युवकावर हल्ला चढविला. दोघांमध्ये झुंज सुरू असताना पिंट्याचा भाऊ पंडित जगताप याने धाव घेत व आदिवासी बांधवांनी आरडाओरडा केला.
त्यामुळे बिबट्याने पळ काढत बंधारपाड्यातीलच पोपट जगताप यांच्या घरात घुसला. घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला. बंधारपाडा येथे नागरी वस्तीत बिबट्या ठाण मांडून बसला असल्याची माहिती रघुनाथ महाजन यांनी अभोणा पोलीस स्टेशन व कनाशी वनविभागाला कळविल्यानंतर तासाभरात वनविभाग व पोलीस बंधारपाड्यात दाखल झाले.
पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना खाली पाडले. त्यात त्यांच्या कानाला व डोक्याला पंजे लागले आहेत. दरम्यान, नागरिकांनी गर्दी-गोंगाट केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
परिसरात लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. जयदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिचारिकेने जखमी पिंट्या जगताप यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. आदिवासी भीतीच्या छायेतया घटनेमुळे बंधारपाडा व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंधारपाडा, उबंरदे, गायदरपाडा, सुपले या परिसरातील पाड्या-वाड्यावर बिबट्याचा वावर असून, बकरी व शेळ्या यांचा फडशा पाडला जात आहे. मंगळवारी बिबट्याने भरदुपारी बंधारपाडा गावात घुसून दहशत पसरवल्याने वनविभागाने परिसरात पिंजरा लावून आदिवासी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी वनविभागाकडे केली आहे. दरम्यान, भेंडी येथील कारभारी देवचंद मोरे यांच्या मळ्यातही रविवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास बिबट्याला अनेकांनी पाहिल्याची चर्चा आहे. शेतात नांगरणी करीत होतो. आमच्याच घराजवळ बिबट्या दबा धरून बसला होता. घरात मुले व जनावरे असल्याने आम्ही त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझ्यावर हल्ला केला.
- पिंट्या जगताप, जखमी युवक
-----------------------
बंधारापाडा गावात बिबट्या दुपारी २ वाजेच्या सुमारास असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी गेलो. बिबट्या पोपट जगताप यांच्या घरात घुसल्याने आदिवासी बांधवांच्या मदतीने बिबट्याला जंगलाच्या दिशेने हुसकावत असताना अचानक बिबट्याने पलटवार केल्याने आदिवासी बांधव घाबरून पळाले. मी अग्रस्थानी असल्याने बिबट्याने माझ्यावर हल्ला केला व मला पाडले. पाठीमागून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी बिबट्यावर वार केल्याने बिबट्या पळाला. नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो.
- बबनराव पाटोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

Web Title: Dreadful fever in Bundarpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल