शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:21 PM2018-09-18T18:21:02+5:302018-09-18T18:22:06+5:30

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

 To draw attention to the government | शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

Next

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.
संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, बंडूनाना भाबड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, नगरसेवक नामदेव लोंढे, भाजपाचे पंचायत समितीतील गटनेते विजय गडाख, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सुधीर रावले, मल्लू पाबळे, अरुण वाघ, शीतल कानडी, रामभाऊ लोणारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सिन्नर बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल व कर्जमाफी, पीकांचे पंचनामे करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात आदिंसह विविध फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, पोलीस निरीक्षक मुंकुंद देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.
तालुक्यात नियोजन नसल्याने पाणीयोजना कोलमडल्या आहेत. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी नाही. लोकप्रतिनिधी समन्वय समितीचे अध्यक्ष असतांना दुष्काळी आढावा बैठक नसल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला. आता लक्ष वेधले तरच शासन आपल्या दारी येईल. मोर्चा शासनाच्या किंवा आमदारांच्या विरोधात नसून लक्ष वेधण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. विद्यमान आमदार व मी दोघेही सत्तेत आहे. मी भाजपात असून मोर्चा काढायला घाबरत नाही, तुम्ही का घाबरता असा सवाल आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव न घेता उपस्थितीत करुन कोकाटे यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकत्र येण्याचे आवाहन केले.
सत्तेत असो किंवा नसो दुष्काळ सर्वांना सारखाच आहे. मात्र मोर्चाबाबत वेगळा विचार का केला जात आहे असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असतांना व आमदार असतांना तालुक्यात जनावरांसाठी छावण्या सुुरु होत्या. शेतकºयांना घरपोहच चारा केला. टॅँकर सुरु करतांना कधी अडचण आली नाही. आता मात्र नियोजन नसल्याने व तालुक्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शेतकºयांवर अशी परिस्थिती ओढावल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. आता सुरु असलेल्या विविध योजना केवळ पैसे खाण्यासाठी असून जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक आमदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. केवळ पत्रव्यवहार करुन प्रश्ने सुटत नाही, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासह बैठका घ्याव्या लागतात. मात्र विद्यमान आमदारांचा अधिकाºयांवर वचक नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.
स्थानिक आमदारांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने व एकही टंचाई आढावा बैठक न झाल्याने लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढावा लागल्याचे कोकाटे म्हणाले. भविष्यात दुष्काळाचे संकट गडद असून त्यासाठी सरकारची गरज भासणार आहे. त्यासाठी मदत मिळावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे कोकाटे म्हणाले.
 

Web Title:  To draw attention to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी