चिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:35 AM2018-05-27T01:35:38+5:302018-05-27T01:35:38+5:30

नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

Documents found: Due to excessive work, absentee assistant engineer of municipal corporation | चिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता

चिठ्ठी सापडली : कामाच्या अतिताणाचे दिले कारण, शोधकार्य सुरू महानगरपालिकेचा सहायक अभियंता बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देकारमध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीसह एक चिठ्ठी सापडली नोकरीच्या ठिकाणी कामाचा अतिताण

नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, रवींद्र पाटील यांच्या कारमध्ये त्यांच्या भ्रमणध्वनीसह एक चिठ्ठी सापडली असून, त्यात नोकरीच्या ठिकाणी कामाचा अतिताण होत असल्याने आपण जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी पाटील यांच्या शोधार्थ तीन पथके तैनात केले असून, रेल्वेस्टेशनसह गोदावरी नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे.
रवींद्र पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, नाशिकरोड येथे शनिवारी (दि.२६) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रमासाठी रवींद्र पाटील हे सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून गेले. दरम्यान, सकाळी पेपरविक्रेत्याने टाकलेला पेपर गॅलरीत न पडता तो पुढच्या पत्र्यावर पडल्याने तो काढण्यासाठी पाटील यांच्या पत्नी शीतल या गॅलरीत आल्या. सदर पेपर त्यांनी खाली ढकलल्याने तो पार्किंगमध्ये पडला. तो आणण्यासाठी शीतल या खाली आल्या असता त्यांना रवींद्र पाटील यांच्या कारचा दरवाजा उघडा दिसला. त्यात त्यांना पाटील यांचा मोबाइल आणि एक डायरी सापडली. पाटील यांना त्याचा विसर पडला असावा म्हणून त्या घरात गेल्या. त्यानंतर १२.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पाटील यांचे जवळचे मित्र असलेल्या महापालिकेतीलच अभियंत्याला दूरध्वनीवरून रवींद्र पाटील यांची विचारणा केली. परंतु, पाटील हे ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात दिसले नसल्याचे उत्तर ऐकायला मिळाले. त्यामुळे शीतल यांना शंका आल्याने त्यांनी पुन्हा कारमध्ये तपासणी केली असता, तेथे चिठ्ठी आढळून आली.

Web Title: Documents found: Due to excessive work, absentee assistant engineer of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक