खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:57 AM2017-08-17T00:57:01+5:302017-08-17T00:58:19+5:30

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.

 Doctor's inquiry into private business | खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांची चौकशी

खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांची चौकशी

Next

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.
स्थायी समितीच्या बैठकीत मुशीर सय्यद यांनी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे सेवेत असतानाही खासगी दवाखाना चालवित असल्याचा आरोप केला. या आरोपादाखल त्यांनी रुग्णतपासणीचे काही पुरावेही सभागृहाला सादर केले. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करता येत नाही, असा नियम असतानाही डॉ. फुलकर हे नियमभंग करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतही काहीच सुधारणा नाही. त्यामुळे डॉ. फुलकर यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुशीर सय्यद यांनी केली. सीमा ताजणे यांनीही बिटको रुग्णालयातील भोंगळ कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि वैद्यकीय अधिकाºयाबद्दल तक्रार केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर डॉक्टरची चौकशी करण्याबरोबरच अन्य डॉक्टरही खासगी प्रॅक्टीस करत असल्यास त्याबाबतचा अहवाल पुढच्या सभेत सादर करण्याचे
आदेश दिले. फवारणीचे वेळापत्रक देण्याचे आदेशसूर्यकांत लवटे यांनी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडे आवश्यक कर्मचारी नसल्याने डास प्रतिबंधक औषध फवारणी होत नसल्याची तक्रार केली. त्यावर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पेस्ट कंट्रोल फवारणीचे प्रभागनिहाय वेळापत्रक सर्व सदस्यांना देण्याचे आदेश आरोग्याधिकाºयांना दिले. सदस्यांनीही कुठे फवारणी होत नसल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. सदस्यांनी आयुक्तांचे डोळे व हात व्हावेत, अशी अपेक्षाही आयुक्त कृष्ण यांनी व्यक्त केली.

Web Title:  Doctor's inquiry into private business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.