अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:04 AM2017-12-07T00:04:27+5:302017-12-07T00:10:30+5:30

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

The district needs 15 crores to compensate for the loss of time | अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

Next
ठळक मुद्देअवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरजजिल्हाधिकाºयांचा प्रस्ताव : साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली होती. वादळी वाºयासह झोडपून काढणाºया पावसाने जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली त्यामुळे खरिपाचे शेतकºयाच्या हाती आलेला हंगामात मोठे नुकसान झाले होते. एकूण साडेसहाशे गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले व त्याचा फटका जवळपास पन्नास हजार शेतकºयांना बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्यावर प्रशासनाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याचे आदेश कृषी खात्यास दिल्याने त्यांनी ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या व ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असता, अवकाळी पावसाने बाजरी, भात, नागली, वरई, भुईमूग, उडीद, सोयाबीन या जिरायती पिकांचे एकूण १४१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले तर द्राक्ष, डाळींब, पेरू, ऊस, कांदा, मका या फळपिकांचे ७३६१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. एकूण ३७७ गावांमधील १९१९७ शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
आताच्या नुकसानीचे पंचनामे हवेतकृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार व शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार ठरवून दिलेल्या प्रत्येक पिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेचा विचार करता १५ कोटी ४४ लाख २७ हजार रुपयांची भरपाई शेतकºयांना द्यावी लागणार आहे. कृषी खात्याने यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला असून, आता शासनाकडे भरपाईची मागणी केली जाणार आहे. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पाठोपाठ ओखी चक्रीवादळानेही जिल्ह्णात प्रचंड नुकसान केल्याने त्यासाठीदेखील पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे.

Web Title: The district needs 15 crores to compensate for the loss of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक