नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार !

By श्याम बागुल | Published: July 15, 2019 06:42 PM2019-07-15T18:42:35+5:302019-07-15T18:45:39+5:30

जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली.

District Central Bank's 'Movement' war! | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार !

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा ‘आंदोलन’ वार !

googlenewsNext
ठळक मुद्देफेडरेशनचे धरणे : स्वाभिमानीकडून प्रवेशद्वार बंदपाय-यांवरच ठिय्या मांडला व बॅँकेत जाणा-या येणा-यांची वाट अडवली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे पतसंस्थांचे अडकून पडलेल्या ठेवी तत्काळ मिळावे यासाठी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेले धरणे आंदोलन व शेतकऱ्यांकडील सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बॅँकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडल्याने सोमवार जिल्हा बॅँकेसाठी आंदोलनाचा वार ठरला. अखेर या संदर्भात तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


जिल्हा बॅँकेत नाशिक जिल्ह्यातील नागरी, बिगर शेती पतसंस्थांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठेवी व खात्यांमध्ये अडकून पडले असून, नोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांची रक्कम जिल्हा बॅँकेत अडकून पडली. त्यामुळे पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. दैनंदिन रोखता रक्कम अडकल्यामुळे पतसंस्थांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नाशिक विभागीय नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हा बॅँकेच्या जुना आग्रारोडवरील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन फेडरेशनच्या पदाधिका-यांनी थेट विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कानी सदरचा प्रकार घातला. यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा बॅँकेचे पदाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना बैठकीसाठी पाचारण करून यावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी फेडरेशनचे पदाधिकारी व बॅँकेच्या पदाधिका-यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर बॅँकेकडे पैसे जमा करण्यासाठी कोणते मार्ग आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात वसंतराव लोढा, गोपाळ पाटील, अंजली पाटील, उत्तमराव पाटील, हेमंत देवधर, आत्माराम मुरकुटे, दिलीप लवटे, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
स्वाभिमानीने रस्ता अडवला
पतसंस्था फेडरेशनचे आंदोलन आटोपत नाही तोच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा बॅँकेवर धडक देत थेट बॅँकेच्या पाय-यांवरच ठिय्या मांडला व बॅँकेत जाणा-या येणा-यांची वाट अडवली. यावेळी बॅँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून गरीब शेतक-यांकडून केली जात असलेल्या सक्तीच्या वसुलीला विरोध दर्शविण्यात आला. सुमारे तासभर ठिय्या मांडल्यानंतर बॅँकेच्या पदाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले. यावेळी शासनाने दुष्काळी भागातील शेतकºयांची सक्तीची वसुली रोखण्याचे आदेश असताना बॅँकेचे कर्मचारी शेतकºयांना कर्जवसुलीच्या नोटिसा तसेच जप्तीची मोहीम राबवित असल्याबद्दल जाब विचारण्यात आला. राज्यातील अन्य बॅँकांना सहकार विभागाकडून आर्थिक मदत केली जात असताना नाशिक जिल्हा बॅँकेलाही सुमारे अडीचशे कोटींची मदत करण्यात यावी, सक्तीने वसुली केल्यास शेतक-यांकडून ते हाणून पाडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे हंसराज वडघुले, नाना बच्छाव, संजय पाटोळे, साहेबराव मोरे, विठ्ठल कोरडे, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब तासकर आदींनी दिला. यावेळी बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, शिरीष कोतवाल, संदीप गुळवे, गणपत पाटील आदी उपस्थित होते. बॅँकने तूर्त वसुली थांबविण्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेने जिल्हा निबंधकांच्या कार्यालयाबाहेरही घोषणाबाजी करून आंदोलन केले.

Web Title: District Central Bank's 'Movement' war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.