जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:33 AM2019-03-24T00:33:51+5:302019-03-24T00:34:05+5:30

जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते.

In the district, 2,500,000 TB found in the district | जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी

जिल्ह्यात आढळले अडीच हजार क्षयरोगी

Next

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२ साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जिवाणुमुळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२ सालापासून बी.सी.जी. लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुनर्उपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी १ हजार ५११ रुग्ण थुंकीदूषित क्षयरोगाचे, तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रुग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.
‘हीच वेळ आहे’ असे आहे घोषवाक्य
यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘हीच वेळ आहे’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्याची, सर्व वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.
‘टीबी’ नोटीफाइड आजार
भारत सरकारने क्षयरोग (टीबी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानुसार सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

Web Title: In the district, 2,500,000 TB found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.