वटार येथे विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:26 AM2019-07-08T00:26:21+5:302019-07-08T00:29:21+5:30

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या वटार गावातील प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते केसर जातीच्या आंब्याच्या २५ रोपांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक कैलास काकुळते यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

Distribution of mango seedlings to students at Vatar | वटार येथे विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप

प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते केसर जातीच्या आंब्याच्या २५ रोपांचे वाटप करण्यात आले.

Next
ठळक मुद्देप्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा,

वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या वटार गावातील प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते केसर जातीच्या आंब्याच्या २५ रोपांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक कैलास काकुळते यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
दुष्काळ व पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सरपंच खैरनार यांनी केले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावण्याचा व संवर्धनाचा संकल्प केला.
यावेळी उपसरपंच जितेंद्र खैरनार, जिभाऊ खैरनार, दौलत बागुल, राजेंद्र खैरनार, संतोष खैरनार, हरिश्चंद्र अहिरे, किशन शिंदे, कैलास काकुळते, प्रकाश देवरे, देवीदास अहिरे, सावित्री देवरे, बंडू शेवाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Distribution of mango seedlings to students at Vatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा