१६०० जात पडताळणी दाखले वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:10 AM2018-06-26T01:10:16+5:302018-06-26T01:11:46+5:30

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.

Distribution of 1600 cast verification certificates | १६०० जात पडताळणी दाखले वितरित

१६०० जात पडताळणी दाखले वितरित

Next
ठळक मुद्देसमाज कल्याण विभाग : पंधरा दिवसांतील कार्यवाही अर्जदार त्रुटींमुळे ८५० अर्ज शिल्लक

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. विशेषत: जून महिन्यात मोठ्या प्रमाणात जात पडताळणी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी दाखले वितरित करण्यात आले आहेत तर अर्जदारांच्या त्रुटींमुळे ८५० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली असून, संबंधितांना त्रुटींबाबतची माहिती कळविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जात पडताळणीसाठी दररोज दीडशे ते दोनशे अर्ज दाखल होत असतात. गेल्या शुक्रवारी तब्बल अडीचशे अर्ज एकाच दिवशी दाखल झाले होते. सोमवारी १९० विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केले. शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे दाखले अनिवार्य असल्याने कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी अचानक वाढली आहे.
प्राप्त अर्जांच्या त्रुटी कमी करण्यासाठी समाजकल्याण जात पडताळणी विभागाने २१ ते २५ रोजी विशेष शिबिरही घेतले होते. या शिबिरास फारसा प्रतिसात लाभला नाही. आजवर २१५८ अर्जांच्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून, आता केवळ ८५० अर्जदार त्रुटी शिल्लक आहेत. तर गेल्या महिनाभरात सुमारे १९०३ नवीन अर्ज दाखल झाले आहेत. रोज अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढतच असून, विद्यार्थ्यांची प्रकरणे दाखल करून घेतली जात असून त्यांना लवकरात लवकर पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठीच कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी असतो. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाºया प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेऊन या कार्यालयाकडून वेगाने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जात असल्याचे उपायुक्त वंदना कोचुरे यांनी सांगितले.जात पडताळणी पूर्ण होऊन अजूनही सुमारे अडीच हजार प्रमाणपत्रे कार्यालयातच पडून आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत कळविण्यात येऊनही पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यार्थी येत नसल्याचे वास्तव आहे. संबंधितांना ३०७५ एसएमएस, २२०० पत्रे पाठविण्यात आलेली आहेत. संबंधितांनी तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधून आपापली जात पडताळणी प्रमाणपत्रे घेऊन जावीत. ज्या विद्यार्थ्यांना येणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याकडे ओळखीचे योग्य पुरावे पाठविल्यास त्यांनादेखील सर्वशहानिशा करूनच प्रमाणपत्र दिले जाईल.
- वंदना कोचुरे, उपायुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

Web Title: Distribution of 1600 cast verification certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.