विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:11 AM2018-06-25T00:11:05+5:302018-06-25T00:11:23+5:30

महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत शालेय साहित्य मोफत देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन फेडरेशनचे नेते विश्राम धनवटे यांनी केले.

 Distribute free school literature to students | विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

googlenewsNext

एकलहरे : महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत शालेय साहित्य मोफत देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन फेडरेशनचे नेते विश्राम धनवटे यांनी केले.  फेडरेशनचे दिवंगत नेते आर. सी. चौधरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आजही पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे धनवटे यांनी सांगितले. खरबंदा पार्क येथील संस्थेच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष पोपटराव पेखळे, पंडितराव कुमावत, प्रताप भालके, ज्योती नटराजन, सुभाष काकड, पंडितराव पगार आदी मान्यवर उपस्थित होते.  माझी इयत्ता पहिली उपक्रमांतर्गत आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पाटी, दप्तर व गणवेश मोफत भेट देण्यात आले. इयत्ता चौथी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया सभासदांच्या पाल्यांना दिवंगत ज्येष्ठ नेते ग. रा. तांबोळी यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा जी. एच. वाघ, बाजीराव सगभोर यांनी घेतला. प्रास्ताविक संस्थेचे उपसभापती सोमनाथ भोर यांनी केले. स्वागत सुनील मालुंजकर यांनी केले. आभार अध्यक्ष पोपट पेखळे यांनी मानले. यावेळी प्रमोद घुले, अनवट, भालके, रघुनाथ ताजनपुरे, बापू गोराणे, भास्कर लांडगे, भरत गोळेसर, गुलाब आहेर, उत्तम गांगुर्डे, बळासाहेब गोसावी, उत्तम उशीर, शरद आहेर, पंडित डोळसे, दत्ता चौधरी, अलका काशिद, पूनम आहेर, सूर्यभान दळवी आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribute free school literature to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.