इंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोय : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:34 PM2017-11-19T23:34:56+5:302017-11-19T23:35:58+5:30

इंदिरानगर : परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने आणि काही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना नगरसेवक डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी तातडीने आधार कार्ड केंदे्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

Disqualification of Indiranagar Aadhaar Card Centers Disadvantage: Request to Sub-Zodiacs | इंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोय : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन

इंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोय : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन

Next
ठळक मुद्देइंदिरानगरला आधार कार्ड केंद्रांची कमतरता गैरसोयनागरिकांची गैरसोय होत आहे.

इंदिरानगर : परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने आणि काही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना नगरसेवक डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी तातडीने आधार कार्ड केंदे्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
परिसरात दिवसागणिक लोकवस्ती वाढत असून, त्या मानाने आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी आणि काही आधार कार्ड केंद्रे बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आता प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड नवीन काढण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी यासह विविध कामे करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड केंद्रावर ये-जा करावी लागते, परंतु परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी आणि काही बंद असल्याने परिसरातील नागरिकांना वेळ व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे.
तातडीने परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, या मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी उपजिल्हाधिकाºयांना दिले आहे.
यावेळी सचिन कुलकर्णी, शिल्पा देशपांडे, मीनल महाजन, शैला विसपुते, अंजली पाटील, स्नेहल घारपुरे, सुधाकर गायधनी, बापू गोरे, भूषण काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Disqualification of Indiranagar Aadhaar Card Centers Disadvantage: Request to Sub-Zodiacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.