कांद्याप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:29 AM2018-12-13T01:29:54+5:302018-12-13T01:30:47+5:30

कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

 Discussion onion with the Central Agriculture Minister | कांद्याप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

कांद्याप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

Next

नाशिक : कांद्याचे भाव दररोज कोसळत असल्याने जिल्ह्णातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा, यासाठी बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. कांद्याच्या भावात सुधारणा होण्यासाठी वाहतूक खर्च आणि निर्यातीवर केंद्र सरकारकडून लवकरच सबसिडी देण्याचे आश्वासन सिंग यांनी दिले.
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत असून, कांदा विक्रीतून शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्णातील शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत असल्याने खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राधामोहन सिंग यांची भेट घेतली. कांदा उत्पादक शेतकºयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.  कांद्याच्या भावाबाबत सिंग यांनीही चिंता व्यक्त केली व लवकरच कांद्याच्या वाहतूक आणि निर्यातीवर सबसिडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title:  Discussion onion with the Central Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.