सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा -पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 08:45 PM2018-08-12T20:45:41+5:302018-08-12T20:48:33+5:30

खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील भाजप सरकारला गेल्या चार वर्षांत कोणत्याही क्षेत्राला चालना देणारी विकासकामे करता आलेली नसून हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली. 

Discussion of Chief Minister change to cover the failures of the government- Prithviraj Chavan | सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा -पृथ्वीराज चव्हाण

सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा -पृथ्वीराज चव्हाण

Next
ठळक मुद्देभाजपने खोटी अाश्वासने सत्ता मिळवलीअश्वासने पूर्ण करण्यात भाजपला अपयश अपयशामुळेच मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा

नाशिक : खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील भाजप सरकारला गेल्या चार वर्षांत कोणत्याही क्षेत्राला चालना देणारी विकासकामे करता आलेली नसून हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली. 
नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी (दि. १२) काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर माजीमंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेवक शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते. यावेळी राज्य व केंद्रातील भाजपाच्या सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट राज्यात व केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. देशातील नाशिकसह बंगळुरू, कोरापूट, कोरवा आदी सार्वजनिक क्षेत्रातील विमान निर्मिती करणाºया कारखान्यांना डावलून संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला विमान निर्मितीचे काम देण्यात आले. विशेष म्हणजे यूपीए सरकारने ५७० कोटी रुपयांना एक राफेल विमान खरेदीचा व्यवहार केलेला असताना केंद्र सरकारने त्याच विमानाची खरेदी करताना एका राफेल विमानासाठी जवळपास १६७० कोटी रुपये मोजून प्रत्येक विमानामागे सुमारे एक हजार कोटी रुपये अधिक दिले आहेत. त्यामुळे ३६ विमानांच्या खरेदीत ३६ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, हा संरक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सरकारने शेतीविषयक चुकीचे आयात-निर्यात धोरण राबवून शेतीमालाचे भाव पाडल्याने शेतकºयांना रस्त्यावर उतरावे लागले. तसेच तरुणांना नोकºया देण्याचे खोटे आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केल्यानंतर नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेऊन त्यांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय क्षेत्रात त्याचा विपरीत परिणाम होऊन तरुणांना नवीन नोकºया मिळण्याऐवजी आहे त्याही नोकºया संकटात आल्याने तरुणांनाही रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची टीका चव्हाण यांनी केली. 

Web Title: Discussion of Chief Minister change to cover the failures of the government- Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.