नवीन प्रशासकीय इमारतीबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:01 AM2018-01-16T00:01:09+5:302018-01-16T00:02:46+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीबाबत चर्चेचा मुहूर्त लागला असून, जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियोजित जागेवरील करावयाच्या प्राथमिक कामकाजाबरोबरच इमारत कामाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या.

Discuss about the new administrative building | नवीन प्रशासकीय इमारतीबाबत चर्चा

नवीन प्रशासकीय इमारतीबाबत चर्चा

Next
ठळक मुद्दे जिल्हा परिषद : शीतल सांगळे यांनी घेतला आढावा; आराखडाही चर्चेतअध्यक्षांनी याविषयाला पुन्हा चालना दिली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीबाबत चर्चेचा मुहूर्त लागला असून, जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियोजित जागेवरील करावयाच्या प्राथमिक कामकाजाबरोबरच इमारत कामाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची सध्याची जागा दिवसेंदिवस अपुरी पडत असल्याने आणि वाहनतळाचा प्रश्न बिकट झाल्याने जिल्हा परिषदेला नव्या जागेची प्रतीक्षा होतीच त्र्यंबकरोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुट पालन केंद्राच्या जागेवर नूतन इमारत बांधण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडूनदेखील हिरवाकंदील मिळाला होता. मात्र त्यानंतर या संदर्भातील हालचाली मंदावल्याने नवीन जागेचा प्रश्न काहीसा मागे पडला होता. सोमवारी अध्यक्षांनी याविषयाला पुन्हा चालना दिली.
त्र्यंबकेश्वररोडवरील आयटीआयजवळील जिल्हा परिषदेच्या कुक्कुटपालन केंद्राच्या जागेवर जिल्हा परिषदेची नवीन इमारत उभी राहणार आहे, तर कुक्कुटपालन केंद्राला पर्यायी जागा देण्यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर या केंद्राला याच भूखंडावरील मागील बाजूस जागा देण्याचा निर्णय झाला असल्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीचाही मार्ग मोकळा झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने यात तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे कामकाजातील अडथळा दूर झालेला आहे. आता या जागेवरी विद्युत तारा हटविणे, जुने बांधकाम पाडणे तसेच वृक्षतोड आणि इतर कामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधी वापरून या कामांना सुरुवात करण्याच्या सूचना अध्यक्षांनी बैठकीत दिल्या आहेत.
बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशस्त प्रशासकीय इमारतीसंदर्भात मुद्दा उपस्थित करीत त्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन व सार्वजनिक बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते. अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात व मुख्यालयाबाहेर होणारी वाहनांची कोंडी व एकंदरीत कमी जागेचा अभाव यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी अनुकूलता दर्शवित त्यासाठी पाठपुरावा केला होता.
सातपूर आयटीआय सिग्नलजवळील पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कूट पालन केंद्राच्या जागेवर जिल्हा परिषदेची प्रशस्त इमारत बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले असून, या इमारतीसाठी सुमारे ४६ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. याप्रकरणी बांधकाम विभागालाही अध्यक्षांनी सूचना केल्या आहेत.
या बैठकीस बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता साळुंके आदी उपस्थित होते. अध्यक्ष, सभापतींचे प्रयत्ननूतन प्रशासकीय इमारतीसाठी बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जिकरीचे प्रयत्न केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. इमारतीसाठी उभयतांनी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, पशुसंवर्धनमंत्री तसेच पालकमत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या आॅगस्टमध्ये मंत्रालयातील ग्रामविकास विभागात मंत्र्यांबरोबर बैठकही घेण्यात आली होती. त्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी अनुकूलता दर्शविली होती. आता त्यास शासनाने मान्यता दिल्याने लवकरच इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Web Title: Discuss about the new administrative building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.