पेपर तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 06:12 PM2018-12-15T18:12:03+5:302018-12-15T18:13:02+5:30

नुकतीच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर पार पडले.

 Discounts from the staff examinations | पेपर तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत

पेपर तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत

Next

सिन्नर : नुकतीच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर पार पडले.
शिबिरात परीक्षा पद्धती, कॉपीमुक्त परीक्षा, ताण-तणाव विरहित परीक्षा, कृती पत्रिका मूल्यमापन पद्धती, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य व शारीरिक शिक्षण, स्व:विकास व कलारस्वाद या एस. एस. सी. परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट विषयांची यथोचित सखोल माहिती व परीक्षा मूल्यमापन पद्धती तसेच या संदर्भीय येणाऱ्या अडी अडचणींची सविस्तर चर्चा व शंका समाधान महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी केले. मुख्याध्यापक, केंद्रसंचालक असतील किंवा आजारपण असेल तर पेपर तपासणी कामातून सवलत देऊ असे काळे यांनी मान्य केले. विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी नाशिक विभागीय मंडळाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडून मुख्याध्यापकांनी पेपर तपासणी कामातून सवलत घेतांनी बदली नाव देण्याची काळजी घ्यावी.विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी विभागीय मंडळाच्या संपूर्ण कामाची
माहिती देऊन आढावा दिला. माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी शासकीय कामकाजाची माहिती दिली. सहसचिव वाय. पी. निकम यांनी विदयार्थी लाभाच्या सर्व योजना सांगितल्या. मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, अनिल शहारे, लेखाधिकारी मोरे, एन. आर. देशमुख, एस. के. सावंत, एस. बी. शिरसाठ, सुरेश शेलार, राजेंद्र सावंत, बी. डी. गांगुर्डे, नंदराज देवरे, डी.एस. ठाकरे, अजय पवार, एस. ए. पाटील, के. पी. वाघ, मनोज वाकचौरे, बाबासाहेब खरोटे, आर. के. शेवाळे, संगीता बाफना, सुनिल फरस, उल्का कुरणे, राजेश बडोगे, किशोर पालखेडकर, डी. जे. जगदाळे यांच्यासह जिल्हाभरातून चौदाशे मुख्याध्यापक हजर होते.

फोटो क्र.- 15२्रल्लस्रँ01
फोटो ओळी- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर पार पडले. त्याप्रसंगी ाहाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे, कृष्णकांत पाटील, नितीन उपासनी, नितीन बच्छाव, वाय. पी. निकम, एस. बी. देशमुख, आर. पी. पाटील, अनिल शहारे, एन. आर. देशमुख, एस. के. सावंत, एस. बी. शिरसाठ, सुरेश शेलार, राजेंद्र सावंत, बी. डी. गांगुर्डे आदि.
 

Web Title:  Discounts from the staff examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.