उमेदवारी जाहीर होत नसल्याने बेचैनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:54 PM2018-07-19T22:54:52+5:302018-07-20T00:17:43+5:30

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अद्याप दोनही पॅनलकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये बेचैनी निर्माण झाली आहे. तोपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येत नसल्याने नाराजी पसरली आहे.

 Disappointment because the candidature is not announced | उमेदवारी जाहीर होत नसल्याने बेचैनी

उमेदवारी जाहीर होत नसल्याने बेचैनी

Next
ठळक मुद्देनिमा निवडणूक : माघारीकडे साऱ्यांचे लक्ष

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अद्याप दोनही पॅनलकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये बेचैनी निर्माण झाली आहे. तोपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येत नसल्याने नाराजी पसरली आहे.
निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता आणि उद्योग विकास पॅनलमध्ये सरळसरळ लढत होणार आहे. ४१ जागांसाठी दोन्ही पॅनलकडून १३१ अर्ज दाखल केले आहेत. २२ जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही पॅनलच्या बैठक सुरू असल्या तरी अजून कोणीही अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. श्रेष्ठींनी कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाºयांच्या जागेसाठी उमेदवारी लवकरात लवकर जाहीर करावी अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
जोपर्यंत अधिकृत उमेदवारी घोषित होत नाही तोपर्यंत प्रचारदेखील
करता येत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. या निवडणुकीसाठी २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
निमाच्या इतिहासात सिन्नरला अद्यापपर्यंत अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. सातपूर, अंबडप्रमाणेच सिन्नरला उद्योगांची संख्या मोठी आहे आणि सातपूर, अंबडप्रमाणेच सिन्नरला जवळपास ७०० मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सिन्नरला लघुउद्योग गटाचे उपाध्यक्ष दिले जावे, अशी अपेक्षा सिन्नरसह नाशिकच्या उद्योजकांनी व्यक्त केली आहे. शेवटी निर्णय एकता पॅनलच्या श्रेष्ठींच्या हातात असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.
निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे, तर सरचिटणीस, खजिनदार, प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, सहायक विवेक गोगटे, एन. टी. अहिरे काम पाहत आहेत.
 

Web Title:  Disappointment because the candidature is not announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.