दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: वीस फेऱ्यानंतर भारती पवार यांनी पावणे दोन लाख मतांनी महाले यांना टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:35 PM2019-05-23T17:35:59+5:302019-05-23T17:36:52+5:30

दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत.

Dindori Lok Sabha election results 2019: After 20 rounds, Bharati Pawar retires Mahale, with two lakh votes | दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: वीस फेऱ्यानंतर भारती पवार यांनी पावणे दोन लाख मतांनी महाले यांना टाकले मागे

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: वीस फेऱ्यानंतर भारती पवार यांनी पावणे दोन लाख मतांनी महाले यांना टाकले मागे

Next

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले ते अद्याप. पवार यांनी १लाख ७६ हजार ५८३ मतांनी २०व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.
 

 

Web Title: Dindori Lok Sabha election results 2019: After 20 rounds, Bharati Pawar retires Mahale, with two lakh votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.